शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
आ. बोदकुरवार यांच्या प्रयत्नांना यश
वणी: ज्या देशातील रस्ते चांगले तो देश वेगाने प्रगती पथावर जातो. हा ध्यास मनात बाळगून संपूर्ण देशात अत्याधुनिक पद्धतीने रस्त्याचे जाळे निर्माण करणारे देशातील विकास पुरुष केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांनी रस्ते विकासासाठी महाराष्ट्राला जो भरीव निधी दिला त्यातील 106 कोटींचा निधी भाजपा आमदारांच्या मागणीवरून रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी दिल्याने कोरोनाच्या संकटकाळात एक आनंदाची झुळूक आली आहे. यात वणी साठी आ. बोदकुरवार यांनी मागितलेले 25 कोटी रुपये सिमेंट रोड साठी दिले आहे.
संपूर्ण देशात आपल्या कल्पकतेने विविध मोठमोठे प्रकल्प आखून ते कमी खर्चात व कमी कालावधीत पूर्ण करण्यात ना. गडकरी यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. केंद्रातर्फे महाराष्ट्राला दिलेल्या दोन हजार चाळीस कोटी लाख इतक्या रकमेतून वणी शहराला दोन हजार चारशे अठ्ठावन लाख रुपये चिखलगाव रेल्वे गेटपासून बस स्टॉप - टिळक चौक ते वरोरा रेल्वे गेट पर्यंत चार पदरी सिमेंट रोड, रस्त्याच्या बाजूला मोठ्या नाल्या व प्रकाशासाठी रस्त्यावर दिवे यातून लावल्या जाणार आहे. या कामामुळे वणी शहराचा चेहरा- मोहरा बदलून जाणार आहे. आ. बोदकुरवार यांच्या प्रयत्नामुळे केंद्र शासनाकडून भरीव निधी प्राप्त झाला आहे.
यासोबत आ. मदन येरावार यांच्या प्रयत्नामुळे 47 कोटींचा निधी अंजनगाव- मूर्तिजापूर- कारंजा- दारव्हा- यवतमाळ मार्गाचे बांधकाम व यवतमाळ शहर लोहारा बायपास ते चिंतामणी पेट्रोल पंप पर्यंतच्या बांधकामासाठी मंजूर झाले आहे. राळेगाव विधानसभेचे आमदार डॉ. अशोक उईके यांच्या प्रयत्नामुळे रस्त्याच्या सुधारणेसाठी 22 कोटी रुपये मिळाले आहे.
त्यातून बाभूळगाव तालुक्यातील मोहा- मदनी-नायगाव- रेणुकापूर मार्गाच्या सुधारणेसाठी 10 कोटी रुपये, धानोरा- सोनेगाव- सावरगाव- आष्ट- बोरी- मोनापूर- राळेगाव रोड पर्यंत रस्ता सुधारणेसाठी 7 कोटी व जोडमोहा- पोटगव्हाण- उमरी- सावरगाव- चिंचोली पर्यंतच्या रस्ते सुधारणेसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. उमरखेड मतदार संघातील भाजपाचे आमदार नामदेव ससाणे यांच्या प्रयत्नामुळे पुसद, गौड, वसंतनगर, उमरखेड, ढाणकी, कुर्ली रोड येथील पुलांच्या बांधकामासाठी 12 कोटी रुपयांचा निधी ना. गडकरी यांनी दिला आहे. यवतमाळ जिल्ह्याला दिलेल्या या भरीव मदतीबद्दल ना. नितीनजी गडकरी यांचे आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आभार व्यक्त केले आहे.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...