खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
बेरोजगार युवकांनी काँग्रेस कमितीच्यावतीने एस.डी.ओ यांना देण्यात निवेदन
वणी: देशातील लाखो युवांना बेरोजगार करणा-या सरकारला जाब विचारण्याचा दिवस म्हणून आज दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोज शुक्रवारला वणी शहर काँग्रेस कमिटीचे वतीने मा उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे याना निवेदन देऊन पाळण्यात आला. हा दिवस पाळला गेला मागील सात वर्षांपासून या सरकारने नौकर भरती बंद केल्यामुळे देशातील लाखो युवक रोजगारिला मुकले आहे.
त्यामुळे या देशातील युवकांनी सरकारला जाब विचारण्यासाठी आजचा हा दिवस पाळण्यात आला आहे. तेव्हा खालील बाबीतून आपबीती युवकांमार्फ़त सांगण्यात आली .जसे नोटबंदी आणि अनियोजित कारभा ,२०१६ मध्ये २ तासांपूर्वीच्या सूचनेवर सामान्यांच्या हातचे पैसे रद्द करून स्वतःचेच पैसे मिळवण्यासाठी रांगेत उभे केले आणि त्यात अनेकांचे जीवही गेले,या धोरणहीन निर्णयामुळे रोजंदारी, लघुद्योग आणि नोकरदारांचा रोजगार गेला ,जीएसटीची अपयशी आणि चुकीची अंमलबजावली झाली त्यात२०१७ मध्ये जीएसटी लागू करण्यात आली. यात लहान उद्योगांना फटका बसला. नोकरदारांनंतर लहानमोठे उद्योग करणा-यांनाही वेठीस धरण्यात आले, अनेकांनी अपयशापोटी उद्योगही बंद केले आले.
देशाच्या अर्थव्यवस्थेसोबत दोन मोठे ब्लंडर केल्यानंतर लाखो लोकांना बेरोजगार केल्यानंतर लघुउदयोगांना स्वयंरोजगाराला चालना देण्याचं ‘पकोड़ा तलो और बेचो’ सारखे बेजबाबदार विधाने केंद्रातील नेतृत्वातून दिली जात आहेत. सरकारी मालमत्ता विकूत आहेत. सरकारी मालमत्ता विकून हजारो नोकरदार रस्त्यावर आले आहे.
मोठमोट्या सरकारी कंपन्यांमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करायचं सोडून त्या बंद करण्याचं कार्य आता केंद्र सरकारने हाती घेतलं आहे. हे म्हणजे घरातली गिरणी विकून पीठ दळण्यासारखं आहे.भाजप फॉर इंडिया नाही, भाजप फॉर अदानी अंबानी :स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सरकारी कंपन्या केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या उद्योजकांना विकण्याचं षडयंत्र रचला जात आहे. यामुळे केवळ बेरोजगारी नाही तर महागाई देखील वाढत आहे.
संबधित निवेदनाच्या सत्यप्रती दादा तांबे म प्र युवा काँग्रेस अध्यक्ष, मा नानाभाऊ पटोले प्रांत अध्यक्ष काँग्रेस कमिटी, मा जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ याना पाठविण्यात आले आहे व लेखी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष संतोष पारखी, शहर काँग्रेस अध्यक्ष प्रमोद निकुरे,जिल्हा उपाध्यक्ष काॅ कमेटी चे इजहार शेख, प्रमोद लोणारे, निलेश परगंटीवार, अक्षय धावंजेवार, हर्षल चापडे, विक्की परगंटीवार, देव इंगळे, अभिजित सोनटक्के ईत्यादी मान्यवरांनी निवेदनावर वर सह्या केल्या आहेत.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...