Home / चंद्रपूर - जिल्हा / लसीकरणाची गती वाढविण्यासाठी...

चंद्रपूर - जिल्हा

लसीकरणाची गती वाढविण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या तालुक्यांना भेटी

लसीकरणाची गती वाढविण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या तालुक्यांना भेटी

बल्लारपूर येथे घेतला यंत्रणेचा आढावा

चंद्रपूर दि. 31 डिसेंबर : जिल्ह्यात दुस-या डोजचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हास्तरावरून नियमित आढावा घेण्यात येत असला तरी प्रत्यक्षात तालुका यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी तालुक्यांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. पहिल्या दिवशी चिमूर उपविभागात विविध ठिकाणी भेटी दिल्यानंतर जिल्हाधिका-यांनी आता बल्लारपूर येथे लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला.

बल्लारपूर येथील उपविभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीला उपविभागीय अधिकारी दीप्ती सूर्यवंशी, तहसीलदार संजय राईंचवार, सहा. मुख्याधिकारी,  जयवंत काटकर, पोलीस निरीक्षक उमेश पाटील, गटशिक्षणाधिकारी श्री. लहामगे, सर्व नोडल अधिकारी तथा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

कोरोना विषाणूचा नव्या व्हेरींयटचा वाढता प्रसार लक्षात घेता शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरीकांचे  लसीकरण पुर्ण होणे अपेक्षित आहे. यासाठी तालुक्यातील नागरीकांच्या लसीकरणाबाबतची माहिती जाणून घेत तालुक्यांनी त्यांच्या क्षेत्रातील नागरीकांचे 100 टक्के लसीकरण येत्या 26 जानेवारीपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी तालुका प्रशासनाला दिले. संबधित तालुक्यातील नागरीकांचा झालेला पहिला व दुसरा डोज तसेच अद्याप लसीकरण न झालेल्या नागरीकांची माहिती प्रत्येक दौ-यात ते जाणून घेत आहेत.

शहरातील नागरिकांचे लसीकरणासाठी करण्यात आलेल्या नियोजनाबाबतची  माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गजानन मेश्राम यांनी तर ग्रामीण भागातील 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्याच्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती बल्लारपूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम यांनी दिली.  दि. 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्याच्या संदर्भातील माहितीसुध्दा त्यांनी जाणून घेतली.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...