Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / नागपूर येथील विभागीय...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

नागपूर येथील विभागीय कापूस संशोधन संस्थेची गुलाबी बोंड अळी निवारणासाठी शेतकऱ्यांच्या शेतात भेट..!

नागपूर येथील विभागीय कापूस संशोधन संस्थेची गुलाबी बोंड अळी निवारणासाठी शेतकऱ्यांच्या शेतात भेट..!

भारतीय वार्ता न्युज पोर्टल ला बातमी प्रकाशित झाली होती. 

 राजू गोरे (शिंदोला) :  शिंदोला या परिसरातील कापूस पिकावर आलेल्या बोंड अळीच्या प्रादुर्भावाची बातमी भारतीय वार्ताच्या दिनांक 30 जुलै च्या अंकात करण्यात आली होती.  सदर वृत्ताची दखल घेत नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्था यांनी विभागीय कृषि अधिकारी पांढरकवडा व तालुका कृषी अधिकारी वणी यांच्या संयुक्त पथकाने बोंड आळी ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात दिनांक पाच ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता भेट दिली.  या पथकात नागपूरच्या संस्थेचे संशोधन अधिकारी चिन्ना बाबू तसेच जगन राठोड उपविभागीय कृषी अधिकारी पांढरकवडा व सुशांत माने तालुका कृषी अधिकारी वणी, पवन कावरे मंडळ कृषी अधिकारी कायर, विशाल घुडे कृषी पर्य.वणी, आर इ बड़े, मुकेश पत्रे, प्रशांत कोठारे कृषी सहाय्यक हजर होते. 

 पथकाने शिंदोला येथील रवींद्र पांगुळ यांच्या शेतात रोगग्रस्त पिकाची पाहणी केली असता त्यांना कापसाच्या पिकावर  डोम कळीमध्ये  बोंडअळी आढळून आली.  पाहणी केल्यावर पथकाने सध्या गुलाबी बोंड आळी सुरवातीच्या अवस्थेत असून हि अळी नान बीटी कापसाच्या झाडांवर आढळून आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता निंबोळी अर्क व इतर कीटकनाशकांची वेळीच फवारणी करून अळीचे नियंत्रण करावे असे मार्गदर्शन केले.   वेळोवेळी कृषी विभागाकडून व केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडून प्रादुर्भावग्रस्त गावांमध्ये कृषी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केल्या जातील व त्यामध्ये बोंड अळी नियंत्रणासाठी मार्गदर्शन केले जाईल अशी ग्वाही दिली.  सदर पथकाच्या भेटीच्या वेळी परिसरातील अनेक शेतकरी तसेच शिंदोला येथील श्री कल्याणी कृषी केंद्राचे संचालक श्री शांतीलाल जैन व श्री संजय भाऊ निखाड़े पंचायत समिती सदस्य वणी तसेच श्री विठ्ठल बोंडे सरपंच शिंदोला गाव ,भारतीय वार्ता चे पत्रकार  श्री  राजू गोरे, रमेश टोंगे, प्रवीण पाल, प्रवीण मेश्राम उपस्थित होते तसेच आजूबाजूच्या गावातील अनेक मान्यवर व शेतकरी सुद्धा खूप संख्येने पथकाच्या भेटी वेळी उपस्थित होते. 

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...