Home / चंद्रपूर - जिल्हा / वनहक्काचा दावा मिळाल्याने...

चंद्रपूर - जिल्हा

वनहक्काचा दावा मिळाल्याने ग्रामस्थांची जबाबदारी वाढली - प्रतिभा धानोरकर

वनहक्काचा दावा मिळाल्याने ग्रामस्थांची जबाबदारी वाढली  - प्रतिभा धानोरकर

चोरा गावाला १९५९ एकर जागेचा सामूहिक वनहक्क; इतर गावांसाठीही प्रयत्न करणार

चंद्रपूर : वनहक्काचा दावा मिळाल्यामुळे ग्रामस्थांची जबाबदारी वाढली आहे. वनोपजातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते ग्रामस्थ आत्मनिर्भर होणार असून वनाचे संरक्षण, देखरेख, नियोजन करावे लागणार आहे. भद्रावती तालुक्यात वनपक्काचा सर्वात मोठा दावा मिळविलेले चोरा गाव ठरले असून यानंतर तालुक्यातील इतर गावांना वनहक्काचा दावा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.

चोरा येथे आयोजित वनहक्काचा दावा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. यावेळी भद्रावतीचे तहसीलदार तहसीलदार महेश शितोडे, पर्यावरम मित्र तथा सामाजिक कार्यकर्ते माधव जिवतोडे, ग्रामसेवक, वनअधिकारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. याचवेळी वायगाव रिठ या गावातील नागरिकांना वनहकक्दावा प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

भद्रावती तालुक्यातील चोरा ग्रामसभेला वनहक्क कायद्यांतर्गत १ हजार ९५९ हेक्टरचा सामूहिक वनहक्काचा दावा मिळाला आहे. त्यामुळे आता ग्रामस्थ या वनावर आपले हक्क प्रस्थापित करणार असून, देखरेख, नियोजन, संरक्षण करणार आहे. या वनापासून मिळणाऱ्या उत्पन्नावरही ग्रामस्थांचा हक्क राहणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांची जबाबदारी वाढल्याचे सांगून तालुक्यातील प्रलंबित इतर वनहक्क दावे आपण स्वत: लक्ष देवून निकाली काढू, असे आश्वासनही आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिले. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...