Reg No. MH-36-0010493

Monday February 03, 2025

24.66

Home / विदर्भ / गडचिरोली / *राज्यशासनाने मंजूर...

विदर्भ    |    गडचिरोली

*राज्यशासनाने मंजूर केलेल्या ओबीसींच्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करा अन्यथा राज्यभर आंदोलन. तसेच बिहार राज्याच्या धरतीवर महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना व केंद्रात ओबीसी मंत्रालय स्थापन करा.डॉ. बबनराव तायवाडे**

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

गडचिरोली:- जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीचे अवचित्त साधून दिनांक १ व २ फेब्रुवारी २०२५ रोजी चिखलदरा येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सिंहावलोकन शिबिर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले.१ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता या शिबिराचे उद्घाटन डॉ. बबनराव तायवाडे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी शिबिराचे स्वागताध्यक्ष व आयोजक राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश साबळे, प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय सरचिटणीस सचिन राजूरकर, राष्ट्रीय सचिव शरद वानखेडे, महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष प्रकाश भागवत, महिला प्रदेशाध्यक्ष ज्योती ढाकणे, रत्नमाला पिसे, राज्य कर्मचारी व अधिकारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्याम लेडे, राज्य प्रवक्ता ऋषभ राऊत, प्रमुख वक्ते बबलू कटरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. या शिबिरासाठी महाराष्ट्रातून  महासंघाचे 300 पदाधिकारी उपस्थित होते.  २९ सप्टेंबर २०२३ रोजी ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांच्या आमरण उपोषणानंतर राज्य सरकारने राष्ट्रीय ओबीसी महासंघ सोबत झालेल्या बैठकीनुसार मंजूर झालेल्या प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी खेद व्यक्त केला. ओबीसी वस्तीगृहामध्ये प्रवेशातील व स्वाधार योजना मधील त्रुटी दूर झालेल्या नसून ओबीसी, एन टी, व्ही जे, व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची मोठी कुचंबना होत असल्याचे ते म्हणाले. महाज्योती मधील  उपक्रमांची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी विभागावर कार्यालये स्थापन करण्याचे तसेच  बिहार राज्याच्या धरतीवर महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना व केंद्रात ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी राज्य व केंद्र शासनाला केले, वरील मागण्यांची पूर्तता तात्काळ न झाल्यास नजीकच्या काळात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने राज्यभर विविध प्रकारच्या आंदोलनाची शृंखला राबवण्यात येईल असा इशाराही त्यांनी याप्रसंगी राज्य शासनाला दिला  राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सचिन राजूरकर यांनी विभागावर संवाद दौरे, संघटनाबाबत दिशा व धोरण याबाबत कृती आराखडा सादर केला व तो सर्वांनुमते मंजूर करण्यात आला.  चिखलदरा येथील सिंहावलोकन शिबिर संघटना मजबुतीसाठी दिशादर्शक ठरेल असे मत स्वागताध्यक्ष व शिबिराचे आयोजक प्रकाश साबळे यांनी यावेळी व्यक्त केले राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या रेटयामुळे राज्य व केंद्र शासनाला 52 शासन निर्णय काढावे लागले या सर्व शासन निर्णयाची योग्य अंमलबजावणी होते किंवा नाही आणि ते समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचते किंवा नाही यावर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे मत राज्य प्रवक्ता ऋषभ राऊत यांनी व्यक्त केले राज्यभरातून आलेल्या ओबीसी पदाधिकाऱ्यांनी खुल्या चर्चेद्वारे आपली मते मांडली. गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींच्या समस्या व पेसा क्षेत्रात वर्ग ३ व  ४ च्या पदभरतीत व बदल्या संदर्भात ओबीसीवर  होणारा अन्याय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास मस्के व जिल्हा महिला अध्यक्ष मंगला कारेकर यांनी मांडला यावळी जिल्हा महिला महासंघाच्या महिला पदाधिकारी प्रा. विद्या म्हशाखेत्री, ज्योती भोयर, अलका गुरनुले आदी उपस्थित होते यावेळी ओबीसी समाजातील विविध मान्यवरांना ओबीसी समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

ताज्या बातम्या

*राज्यशासनाने  मंजूर केलेल्या ओबीसींच्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करा अन्यथा राज्यभर आंदोलन. तसेच बिहार राज्याच्या धरतीवर महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना  व केंद्रात ओबीसी मंत्रालय स्थापन करा.डॉ. बबनराव तायवाडे** 03 February, 2025

*राज्यशासनाने मंजूर केलेल्या ओबीसींच्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करा अन्यथा राज्यभर आंदोलन. तसेच बिहार राज्याच्या धरतीवर महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना व केंद्रात ओबीसी मंत्रालय स्थापन करा.डॉ. बबनराव तायवाडे**

*राज्यशासनाने मंजूर केलेल्या ओबीसींच्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करा अन्यथा राज्यभर आंदोलन. तसेच बिहार राज्याच्या...

*ट्रॉक्टरची इंजिन तुटून ट्रॉक्टर पलटी जिवित हानी नाही* 03 February, 2025

*ट्रॉक्टरची इंजिन तुटून ट्रॉक्टर पलटी जिवित हानी नाही*

*ट्रॉक्टरची इंजिन तुटून ट्रॉक्टर पलटी जिवित हानी नाही* ✍️गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली:-वैरागड वरून आरमोरी...

विरकुंड येथे “आमदार चषक” कबड्डीच्या सामन्याचे आयोजन, “जय बजरंग क्रिडा मंडळ” विरकुंड तर्फे लाखोंच्या बक्षिसाची लय लुट . 02 February, 2025

विरकुंड येथे “आमदार चषक” कबड्डीच्या सामन्याचे आयोजन, “जय बजरंग क्रिडा मंडळ” विरकुंड तर्फे लाखोंच्या बक्षिसाची लय लुट .

वणी ः- तालुक्यातील अतिशय प्रसिध्द असलेल्या नवेगाव ( विरकुंड ) येथे “आमदार चषक” जय बजरंग क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य-दिव्य...

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न*    *परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते* 02 February, 2025

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न* *परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते*

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न* परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते ✍️गडचिरोली...

पहाड वनमाळी समाजाचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात. 01 February, 2025

पहाड वनमाळी समाजाचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात.

वणी: पहाड वनमाळी समाज वणी शाखेच्या वतीने स्नेहमिलन सोहळा उत्साहात साजरा झाला. मकर संक्रांतिनिमित्त हा कार्यक्रम स्थानिक...

स्माॅर्ट मिटर सक्तीने लावण्याचे धोरण बंद करावे अन्यथा जिल्ह्यातील सर्व तहसील व विद्युत वितरण कार्यालयावर भाकपचे वतिने प्रचंड मोर्चे काढणार - कॉ.अनिल हेपट 01 February, 2025

स्माॅर्ट मिटर सक्तीने लावण्याचे धोरण बंद करावे अन्यथा जिल्ह्यातील सर्व तहसील व विद्युत वितरण कार्यालयावर भाकपचे वतिने प्रचंड मोर्चे काढणार - कॉ.अनिल हेपट

वणी -राज्यातील जनतेच्या घरी घरगुती विद्युत मिटर व्यवस्थित सुरु असतांना भांडवली कंपनीला खुश करण्यासाठी जुने मिटर...

गडचिरोलीतील बातम्या

*ट्रॉक्टरची इंजिन तुटून ट्रॉक्टर पलटी जिवित हानी नाही*

*ट्रॉक्टरची इंजिन तुटून ट्रॉक्टर पलटी जिवित हानी नाही* ✍️गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली:-वैरागड वरून आरमोरी...

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न* *परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते*

*निःशुल्क बौद्ध धम्मीय मेळावा नागभिड येथे संपन्न* परिचय मेळाव्यातून वेळ आणि पैशाची बचत होवून लग्न जुळणे सोपे होते ✍️गडचिरोली...

*भारतीय बौध्द महासभा शाखा आरमोरी व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळ आरमोरी यांच्या वतीने पंजाब येथील अम्रतसर घटनेचा केला जाहीर निषेध*

*भारतीय बौध्द महासभा शाखा आरमोरी व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळ आरमोरी यांच्या वतीने पंजाब येथील अम्रतसर घटनेचा...