Home / विदर्भ / गडचिरोली / *उच्च न्यायालयाच्या...

विदर्भ    |    गडचिरोली

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*

 

*तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

 

✍️मुनिश्वर बोरकर.

   गडचिरोली

 

गडचिरोली:-देसाईगंज उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर, यांचे कोणतेही आदेश नसतांना रीट पिटीशन क्रमांक - 5798/2023 प्रकरण न्याप्रविष्ठ असताना सुद्धा जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी उच्च न्यायालयाची अवहेलना करून रिट पीटिशन दखल केलेल्या प्रकरणात नसुझ खसरा नंबर - 22/80/1 पैकी 156.57 चौ.मी. नझुल जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी सक्तीचे आदेश दिल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे जिल्हाधिकारी यांनी अवहेलना केल्याचे न्यायालयीन वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, देसाईगंज खसरा नझूल क्रमांक नंबर - 22/80/1 पैकी 156.57 चौ.मी.  जागेचा वाद उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर येथे प्रकाश दुबे विरुध्द युवराज ठवरे असा सुरू असताना दि. 26/11/2024 रोजी नागपूर खंडपीठाने सदर प्रकरणात जिल्हाधिकारी गडचिरोली यांना पार्टी नंबर 2 बनविण्याचे आदेश पारित केले. त्यानुसार जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी सदर प्रकरणात तब्बल 2 महिन्यानंतर रीट पीटिशन दाखल केलेले दुबे, ठवरे यांच्या सह विट्ठल नागपूरे, अशोक सरकार  या चौघांना तहसिलदार देसाईगंज यांचे कार्यालय क्र.कवि/महा.सहा./प्रस्तु-1/39/2025 दि. 09/01/2025 चे पत्र देऊन जिल्हाधिकारी गडचिरोली व उपविभागीय अधिकारी देसाईगंज यांच्या आदेशाचा हवाला देऊन तहसीलदार देसाईगंज यांनी सक्तीने अतिक्रमण काढण्याचे पत्र दि. 10/01/2025 रोजी दिले. दोन दिवस शासकीय सुट्टी असल्याने रिट पीटिशन दाखल केलेल्या  दुबे यांनी पत्राचे लेखी उत्तर देसाईगंज तहसीलदार यांना दि. 13-1-2025 रोजी  सादर केले. व सदर प्रकरणात उच्च न्यायालय खंडपिठ नागपूर यांचे कोणतेही आदेश नसल्याचा पुरावा जोडला व तशी विनंती सुद्धा केली. परंतु जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे आदेश असल्याने तहसिलदार देसाईगंज यांनी  दुबे यांच्या लेखी पत्राला न जुमानता अतिक्रमण काढण्यासाठी सक्तीने कार्यवाही करण्यास आपल्या ताफ्यासह अतिक्रमण स्थळी दाखल होऊन अतिक्रमण काढा अन्यथा आम्ही सामान जप्ती करू असा दम भरला त्यामुळे अतिक्रमन धारक प्रकाश दुबे, विठ्ठल नागापूरे, अशोक सरकार, युवराज नामदेव ठवरे सामान जप्ती होणार या भीतीपोटी स्वफुर्तीने तहसीलदार यांच्या समक्ष अतिक्रमण सामान काढण्यास सुरुवात केली. जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे आदेश असल्याने तहसीलदार देसाईगंज यांनी कारवाई करीत असल्याचा हवाला दिला.दरम्यान सदर प्रकरणात जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर यांचे कोणतेही आदेश नसतांना सुद्धा उच्च न्यायालयाचा अवमान केल्याने मोठी खळबळ माजली आहे. सदर प्रकरणात उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर अतिक्रमण धारकांना चुकीच्या कार्यवाही बद्धल कोणता दिलास देते याकडे देसाईगंज शहर वासियांचे लक्ष आहे.

ताज्या बातम्या

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश* 14 January, 2025

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश*

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...

लायन्स क्लब व लायन्स इं मिडी.स्कूल वणी चे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन, दोन्ही संस्थांचे ५० व्या वर्षीत पदार्पण. 13 January, 2025

लायन्स क्लब व लायन्स इं मिडी.स्कूल वणी चे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन, दोन्ही संस्थांचे ५० व्या वर्षीत पदार्पण.

वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...

गडचिरोलीतील बातम्या

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश*

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...