Home / विदर्भ / गडचिरोली / *सुरजागड कंपनीच्या...

विदर्भ    |    गडचिरोली

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी* *धमकी देण्याविरोधात कारवाई करा . मारकवार यांची मागणी*

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी*    *धमकी देण्याविरोधात कारवाई करा . मारकवार यांची मागणी*

*सुरजागड कंपनीच्या विरोधात नारेबाजी केल्याबद्दल माकपचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांना जिवे मारण्याची धमकी*

 

*धमकी देण्याविरोधात कारवाई करा.मारकवार यांची मागणी*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली  

 

गडचिरोली:-सुरजागड येथील ठाकुरदेव यात्रेच्या कार्यक्रमात खदान कंपनी लाॅयड मेटल्स च्या विरोधात नारेबाजी केल्याच्या रागातून सुरजागड कंपनीतील भोलू याने हात पाय तोडण्याची व जिवानिशी ठार मारण्याची मारकवार यांना धमकी दिली असून भोलू याचेवर कारवाई करुन त्याचा बंदोबस्त करावा व खदान विरोधी कार्यकर्त्यांच्या जिविताच्या सुरक्षेची उपाययोजना तातडीने करण्यात यावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे केली आहे.काॅ. अमोल मारकवार यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे मेलद्वारे केलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, ५ ते ७ जानेवारी दरम्यान सुरजागड येथील ठाकुरदेवाची यात्रा पार पडली. या यात्रेत स्थानिक आदिवासी जनतेची सहानुभूती मिळविण्याच्या प्रयत्नात लाॅयड मेटल्स कंपनीने गोटूलच्या मागे शौचालय व इतर झगमगाट केल्याने, आमच्या पारंपारिक यात्रेत आणि संस्कृतीमध्ये ढवळाढवळ करण्याचे काम कंपनी करीत असल्याचा रोष इलाख्यातील पारंपारिक प्रमुख व कार्यकर्ते यांनी व्यक्त केला. त्यामुळे ६ जानेवारी रोजी सप्तरंगी ध्वजवंदनेच्या वेळी कंपनीच्या विरोधात नारे देण्यात आले. नेमका याचाच राग मनात धरून बुधवार दिनांक ८ जानेवारी रोजी शेकापचे नेते भाई रामदास जराते व ॲड. लालसू नरोटे यांना वाॅट्स अप काॅल करुन भोलू  यानी,  अमोल मारकवार याने लाॅयड मेटल्स कंपनी आणि कंपनीचे डायरेक्टर  यांच्या विरोधात मुर्दाबादचे नारे दिले आता तो कसा जिवंत राहतो, त्याचे आता हातपाय तोडल्याशिवाय राहत नाही. अशी धमकी दिली.सदर घटनेवरून मारकवार यांना प्रचंड धक्का बसलेला असून नुकताच छत्तीसगड येथील NDTV चे पत्रकार मुकेश चंद्राकार यांनी ठेकेदारांच्या रोड कामाच्या विरोधात बातमी प्रकाशित केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणा संबंधी गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांनी मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळेस पत्रकार प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी गडचिरोलीचे काही ठेकेदार , कंपनीधारक त्यांच्या विरोधात बातम्या लिहल्या तर पत्रकारांना व राजकीय लोकांना धमक्या देतात तेव्हा पत्रकार मुकेश चंद्राकार यांची पुर्नरावृती होवू नये तेव्हा SP नी पत्रकारांना संरक्षण घ्यावे अशी मागणी केलेली आहे.सुरजागड कंपनीत असलेला वैरागड येथील हा भोलु ठेकेदारांचा दलाल यापूर्वी जिल्हाभरात अवैध दारू तस्करीचे रॅकेट चालवायचा. त्या बदल्यात त्याच्या विरोधात आरमोरी सह विविध पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच त्या अवैध तस्करी बाबत त्याचेवर 'मोक्का' ॲक्ट लावण्याची कारवाई सुद्धा त्यावेळी प्रस्तावित करण्यात आलेली होती. मात्र दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारूची तस्करी करून करोडो रुपयांची माया जमविली आणि त्या संपत्तीच्या जोरावर आपल्यावरच्या केसेस दडपण्याचे प्रयत्न केलेले आहेत. हप्तेबाजीतून त्यावेळी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधातून साधारणतः २०१६ पासून त्याने, लाॅयड मेटल्स कंपनीच्या खदानीला स्थानिकांचा होणारा विरोध मोडून काढण्यासाठी पुढाकार घेतला व कंपनीचा मोरक्या म्हणून तो काम पाहत आहे. यातून दहा-बारा वर्षांपूर्वी काहीच संपत्ती नसलेल्या भोलू याने आपल्या आणि नातेवाईकांच्या नावाने २५० ते ३०० कोटींची संपत्ती जमवल्याची सध्या चर्चा आहे. त्यातून त्याचे अनेक राजकीय पक्षांचे नेते, आमदार, मंत्री, प्रशासनातले वरीष्ठ अधिकारी यांच्याशी जवळचे संबंध प्रस्थापित झाले आहेत. त्याच जोरावर या दारू तस्कर, गुंड प्रवृत्तीच्या भोलुची हिम्मत वाढलेली असून लोहखानीतून वाहतुक करणाऱ्या ट्रकांच्या अपघातात मृत्यू पावलेल्या शेकडो परिवारांना धमकावून, जबरीने पैसे देऊन चुपचाप बसविले व अधिकाऱ्यांना हप्ते देऊन अपघातांचे पुरावे नष्ट केले किंवा केसेस दडपून टाकल्या आहेत. भोलू कंपनीचा आर्थिक पाठबळ आणि त्यातून प्रशासनाचा अभय मिळत गेल्याने आता खदान विरोधी कार्यकर्त्यांना युएपीए सारख्या प्रकरणात अधिकाऱ्यांना हाताशी धरून गुंतविण्याचा नाहीतर जिवंत मारण्याच्या धमक्या देण्यापर्यंत मजल गेलेली आहे, असा आरोपही काॅ. अमोल मारकवार यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.राज्यात सध्या गाजत असलेले बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख आणि लगतच्या छत्तीसगड राज्यातील लोकप्रिय पत्रकार मुकेश चंद्रकार यांची झालेली हत्या बघता लाॅयड मेटल्स कंपनीच्या वतीने भोलू याने मला मारून टाकण्याची, हातपाय तोडण्याची दिलेल्या धमकीच्या घटनेकडे दुर्लक्ष करण्यासारखे नसून मला आणि भाई रामदास जराते, सैनु गोटा, ॲड. लालसू नरोटे अशा प्रमुख खदान विरोधी कार्यकर्त्यांना जिवंत मारणे, हातपाय तोडणे, नक्षल समर्थनाच्या खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून जेलमध्ये टाकणे या संबंधाने सुरक्षा मिळणे अत्यावश्यक आहे. करिता मला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भोलू यांचा बोलवता धनी कोण आहे? याचा पडदाफाश करण्यात यावा अशीही मागणी मारकवार यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश* 14 January, 2025

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश*

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...

लायन्स क्लब व लायन्स इं मिडी.स्कूल वणी चे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन, दोन्ही संस्थांचे ५० व्या वर्षीत पदार्पण. 13 January, 2025

लायन्स क्लब व लायन्स इं मिडी.स्कूल वणी चे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन, दोन्ही संस्थांचे ५० व्या वर्षीत पदार्पण.

वणी:- लायन्स क्लब वणी व लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना इ.स.१९७५ साली झाली असून दोन्ही संस्था ५० व्या वर्षांत...

रेती घाटांचा लिलाव झालेला नसतांना सुध्दा तालुक्यात रेतीचा महापूर. 13 January, 2025

रेती घाटांचा लिलाव झालेला नसतांना सुध्दा तालुक्यात रेतीचा महापूर.

वणी:- तालुक्यातील कुठल्याही रेती घाटाचा सध्या शासकीय लिलाव झाला नसताना उपसा कसा होतो किंवा रेतीच्या आधारे चालणारे...

गो रक्षक हिंदुत्ववाद्यांनी वणी पोलिस स्टेशन मध्ये केले ठिय्या आंदोलन, खऱ्या आरोपींना अटक करा. 13 January, 2025

गो रक्षक हिंदुत्ववाद्यांनी वणी पोलिस स्टेशन मध्ये केले ठिय्या आंदोलन, खऱ्या आरोपींना अटक करा.

वणी:- दिपक टॉकीज परिसरात दिनांक ११ जानेवारी रोजी रस्त्यावर गो- वंशाचे मुंडके व मास टाकून आढळले. सोबत याच परिसरात मोठ्या...

गडचिरोलीतील बातम्या

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश*

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...