Home / विदर्भ / गडचिरोली / *नागरी सहकारी पतसंस्था...

विदर्भ    |    गडचिरोली

*नागरी सहकारी पतसंस्था बॅको पतसंस्था ब्लु रिबन* *पुरस्काराने सन्मानित* सहका

*नागरी सहकारी पतसंस्था बॅको पतसंस्था ब्लु रिबन* *पुरस्काराने सन्मानित* सहका

*नागरी सहकारी पतसंस्था बॅको पतसंस्था ब्लु रिबन* *पुरस्काराने सन्मानित* सहका

 

✍️मुनिश्चर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली: दि. गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गडचिरोली या संस्थेला सलग दुस-यांदा २०२३ च्या बँको पतसंस्था ब्लु रिबन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या पुरस्काराने पुन्हा एकदा संस्थेच्या शिरपेचात माणाचा तुरा रोवण्यात संस्थेला यश मिळाले आहे. सदर पुरस्कार १३ फेब्रुवारी २०२४ रोजी दमण ( दमन व दीव) येथे सहकारी पतसंस्थांसाठी आयोजित बॅको अॅडव्हॉन्टेज सहकार परिषद २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार आयुक्त श्री मधुकरराव चौधरी व बँकोचे सन्माननीय संचालक यांचे हस्ते  प्रदान करण्यात आला.महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला बळकटी आणणा-या सहकारी पतसंस्थांना त्यांच्या कार्याना प्रोत्साहन मिळावे. या हेतुने दरवर्षी उत्कृष्ट पतसंस्थाना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. यासाठी महाराष्ट्रातील विविध सहकारी पतसंस्थाकडुन ठरविलेले मापदंडानुसार प्रस्ताव मागितले जाते. १०० कोटीच्या वर ठेवी असलेल्या प्रवर्गातुन संस्थेने दिलेल्या प्रस्तावाचे परिक्षण करुन तज्ञ परिक्षण समितीने दिलेल्या अहवालानुसार संस्थेला बँको पतसंस्था ब्ल्यु रीबन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल पा. म्हशाखेत्री, संचालक श्री. दिलीप उरकुडे, श्री. शेषराव येलेकर, श्री. दिलीप खेवले यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्विकारला.गडचिरोली सारख्या आदिवासी व नक्षलग्रस्त भागात आर्थिकदृष्टया भक्कम, ठेवीना संपुर्ण संरक्षण, ग्राहकांच्या प्रचंड विश्वास आणि सहकार खात्याच्या प्रत्येक निकषात तंतोतंत बसणारी दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था हि जिल्हयाच्या सहकार क्षेत्रात अतिशय विश्वसनिय पतसंस्था म्हणुन तिची ख्याती आहे. या पतसंस्थेला सलग यांदा बॅको ब्ल्यु रीबन पुरस्कार मिळाल्याबददल पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पा. म्हशाखेत्री, उपाध्यक्ष सुमती मुनघाटे, मानद सचिव सुलोचना वाघरे, संचालक पंडीत पुडके, प्रा. एम.जे. कोटगले, पवन मुनघाटे, मुकुंद म्हशाखेत्री, किशोर मडावी, संध्या खेवले, कृष्णा दुधे, पांडुरंग चिलबुले, व्यवस्थापक लिंगाजी मोरांडे, भूषण रोहणकर, सर्व शाखा व्यवस्थापक, कर्मचारी व अभिकत्यांचे अभिनंदन होत आहे.

ताज्या बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...