Home / विदर्भ / गडचिरोली / *महिलांना सामाजिक, आर्थिक...

विदर्भ    |    गडचिरोली

*महिलांना सामाजिक, आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील:खासदार अशोक नेते*

*महिलांना सामाजिक, आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील:खासदार अशोक नेते*

*महिलांना सामाजिक, आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील:खासदार अशोक नेते*

 

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली .

 

चिमूर:- दिंनाक ३१ जानेवारी २०२४ रोज बुधवारला मकरसंक्रांतीच्या निमित्ताने खास महिला-भगिनींसाठी भाजपा महिला आघाडी तालुका चिमूर च्या वतीने बक्षीस वितरण व हळदी कुंकू स्नेह मिलन कार्यक्रम सोहळा अभ्यंकर मैदान( किल्ला) चिमूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.हळदी कुंकू व बक्षीस वितरण या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलां भगिनींना मार्गदर्शन करतांना *खासदार अशोक नेते* म्हणाले की, शासन आपल्या स्तरावर महिला भगिनींसाठी अनेक लोकापयोगी कार्य करीत आहे.मग तो महिलांच्या सुरक्षेचा असो, महिलांच्या योजनेचा असो, महिला सक्षमीकरणाचा असो अशा विविध स्तरावर शासन कार्य करीत आहे.महिलांना सामाजिक, आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील आहे.केंद्र सरकारने महिलांसाठी राजकीय आरक्षण 33% करून महिलांचा सन्मान केलेला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या वतीने राज्यभरात महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महिला सक्षमीकरण या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना व पुरुषांना  समान अधिकार तसेच महिलांसाठी व पुरुषांसाठी एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ घेता येईल म्हणून राज्य सरकारने महिला सक्षमीकरण हा कार्यक्रम राबविलेला आहे.याबरोबरचं देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी महिलांसाठी  सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिलांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. असे प्रतिपादन बक्षीस वितरण व हळदी कुंकू स्नेह मिलन या कार्यक्रमाच्या प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.पुढे बोलतांना खासदार महोदयांनी या देशाचे पंतप्रधान मान. नरेंद्र मोदीजी यांनी सुरू केलेली शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधी महिला भगिनींसाठी सुद्धा लाभदायक असून या योजनेत वाढ निश्चितच होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करत सदर कार्यक्रमा बरोबरच हळदी कुंकू म्हणजे हिंदू संस्कृतीतील स्त्रियांसाठी एक सौभाग्याचालेन या माध्यमातून  महिलांनी कसलाही भेदभाव न ठेवता स्वतःला प्रगत करावे स्त्रियांनी एकमेकांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करावे.यासाठी हळदी-कुंकु कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी एकजुट व्हावे.असे व्यक्तव्य यावेळी खा.नेते यांनी केले.*मार्गदर्शन*यावेळी कीर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया व सिनेतारका प्राजक्ता माळी यांनी महिला भगिनींसाठी उत्कृष्ट उपदेशात्मक महिलांसाठी मार्गदर्शन केले.*सत्कार समारंभ*या कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार अशोक नेते यांना आदर्श संसद पुरस्कार मिळाल्याने या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार कीर्ती कुमार (बंटीभाऊ) भांगडिया यांच्यासह सिनेतारका प्राजक्ता माळी व भाजपा पदाधिकाऱ्यांनी  यावेळी खासदार' महोदयांचे शाल श्रीफळ,पुष्पहाराने मान सन्मान करून सत्कार करण्यात आले.*भाजपात पक्षप्रवेश*याप्रसंगी खासदार अशोक नेते व आमदार कीर्तीकुमार( बंटीभाऊ) भांगडीया यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष रमेशभाऊ ठाकरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपाचा दुपट्टा टाकून  पक्षप्रवेश केला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मायाताई नन्न्नावरे,उत्कृष्ट सुत्रसंचालन नितूताई पोहनकर,  आभारप्रदर्शन गिताताई लिंगायत यांनी केले.यावेळी प्रामुख्याने मंचावर खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते, आमदार कीर्तीकुमार ( बंटीभाऊ) भांगडीया, सिनेतारका प्राजक्ता माळी, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजूकर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. श्यामजी हटवादे, भाजपा ओबीसी आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष राजुभाऊ देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार,चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तळवेकर,भांगडिया फाउंडेशनच्या संचालिका सौ. अर्पणाताई, मनीषाताई, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्रीरंग (बालुभाऊ) पिसे,भाजपा ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष एकनाथ थुटे, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्याम डुकरे,नागभीड भाजपा तालुकाध्यक्ष संतोष रडके, भाजपा शहराध्यक्ष बंटीभाऊ वनकर,महिला मोर्चा प्रदेश सचिव  ममताताई डुकरे,माजी जि.प. उपाध्यक्षा रेखा कारेकर,भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मायाताई नन्न्नावरे,माजी तालुकाध्यक्ष तथा जेष्ठ नेते किशोर मुंगले, सहकार आघाडी चे ओमप्रकाश गणोरकर, अल्पसंख्यांक आघाडीचे कलीम शेख,माजी जि.प.सदस्या गिता लिंगायत,आशाताई मेश्राम, छाया कंचरलावार,भारती गोडे,तसेच हजारोंच्या मोठ्या संख्येने महिला भगिनीं उपस्थित होते.

ताज्या बातम्या

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..*    *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात 01 January, 2025

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* 01 January, 2025

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* 31 December, 2024

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध*

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज. 31 December, 2024

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...

गडचिरोलीतील बातम्या

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध*

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...