Home / विदर्भ / गडचिरोली / *संविधान सन्मानार्थ...

विदर्भ    |    गडचिरोली

*संविधान सन्मानार्थ चंद्रपुरात 26 जानेवारी ला भव्य बाईक रॅलीचे आयोजन*

*संविधान सन्मानार्थ चंद्रपुरात 26 जानेवारी ला भव्य बाईक रॅलीचे आयोजन*

*संविधान सन्मानार्थ चंद्रपुरात 26 जानेवारी ला भव्य बाईक रॅलीचे आयोजन*

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

 

गडचिरोली:-भारतीय संविधानाला 26 नोव्हे1949 रोजी संविधान सभेने मान्यता दिली. हे संविधान 26 नोव्हे 1950 ला प्रत्यक्ष स्वीकृत केल्या गेले. भारतीय संविधान हे मानव मुक्तीचा खरा आणि अमूल्य असा दस्ताऐवज आहे. म्हणून हजारो वर्षाच्या गुलामी नंतर भारतीय जनतेसाठी खऱ्या अर्थाने 26 जाने 1950 हा मानव मुक्ती दिन आहे.न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधूता, धर्मनिरपेक्षता या मानवीय मुल्याना वाढवून, भारताची एकता व एकात्मता अधिक मजबूत करण्या ऐवजी बीजेपी च्या नेतृत्वातील वर्तमान केंद्र सरकार देशातील जनतेला धार्मिक, जातीय, गरिबी व श्रीमंत आणि लैंगिक आधारावर विभाजीत करून भारतीय संविधानाची मानवीय मुल्ये कमजोर करू पाहत आहे. म्हणून भारतीय संविधानाची मुल्ये जनमानसात अधिक मजबुतीने रुजविणे हे प्रत्येक भारतीयचे कर्तव्य आहे.*यासाठी येत्या गणराज्य दिनी 26 जाने 2024 ला चंद्रपुरात भव्य बाईक रॅली काढून संविधानाचा व भारतीय गणराज्याचा सन्मान करण्याचा निर्णय सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट च्या जटपुरा गेट येथील संपन्न कार्यकर्ता बैठकीत घेण्यात आला. बैठकीला सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, MIM, CPI, CPM, भारत जोडो, काँग्रेस सेवादल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वंचित बहुजन आघाडी, मुस्लिम आरक्षण हक्क संघर्ष समिती, आल इंडिया समता सैनिक दल, ओबीसी जनगणना समन्वय समिती, तेली महासंघ, कुणबी समाज संघटना, माळी महासंघ, बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन, स्वतंत्र मजदूर युनियन, विविध सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.*

*संविधान सन्मान  बाईक रॅली चे प्रारंभ स्थळ : गांधी चौक, चंद्रपूर*

वेळ : सकाळी 9.30 वा

*बाईक रॅली मार्ग : गांधी चौक, डॉ आंबेडकर पुतळा चौक, जटपुरा गेट, रामनगर, डॉ आंबेडकर कॉलेज, जुना वरोरा नाका चौक, जनता कॉलेज, गजानन मंदिर चौका पासून परत जुना वरोरा नाका चौक, उड्डान पूल मार्गे ट्रॅफिक पोलीस चौक, तुकूम मातोश्री चौक, एसटी वर्कशॉप चौक, परत मातोश्री चौक, गुरुद्वारा रोड मार्गे छत्रपती मेडिकल ते आदर्श पेट्रोल पम्प, बंगाली कॅम्प मार्गे MEL चौक, परत बंगाली कॅम्प चौक, राम नगर पोलीस स्टेशनं बस स्टॅन्ड, प्रियंदर्शिनी चौक, जटपुरा गेट मार्गे कस्तुरबा चौक, अंचलेश्वर गेट मार्गे बागला चौक, परत अंचलेश्वर गेट मार्गे भानपेठ मार्गे जुना पोष्ट ऑफिस मार्गे कस्तुरबा चौक, जेल रोड मार्गे जोड देऊळ चौक, मेनरोड मार्गे गांधी चौक येथे समारोप करण्यात येणार आहे. तरी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समन्वयक बळीराज धोटे यांनी केलेले आहे.

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...