Home / विदर्भ / गडचिरोली / *नाट्यश्री च्या कवितास्पर्धेत...

विदर्भ    |    गडचिरोली

*नाट्यश्री च्या कवितास्पर्धेत सत्तू भांडेकर आठवड्याच्या कवितेचे मानकरी .

*नाट्यश्री च्या  कवितास्पर्धेत सत्तू भांडेकर आठवड्याच्या कवितेचे मानकरी .

 

गडचिरोली:

  स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली' च्या वतीने नविन वर्षात "आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता" हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येत आहे.  या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला  कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.  या कवितेला "आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी" म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.

     या उपक्रमाचे दुसरे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३८ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून  गडचिरोली जिल्ह्यातील,मौजा - गिलगाव (जमीं.) तालूका - चामोर्शी येथील सत्तू भांडेकर यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या "अवकाळी पाऊस" या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.

      कवी सत्तू भांडेकर हे नवोदित कवी असून आरोग्य विभागात उप जिल्हा रुग्णालय,मुल (जि. चंद्रपूर) येथे  आरोग्य सेवक या पदावर कार्यरत आहेत. त्यांचा 'तू ओढ सागराची' हा कवितासंग्रह प्रकाशित झालेला असून ते सातत्याने कवितालेखनाचे कार्य करीत आहे. अनेक पुरस्काराने ते सन्मानित आहेत.

       त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

       या दुसऱ्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रभाकर दुर्गे, सुनील मंगर, तुळशीराम उंदीरवाडे, उपेंद्र रोहनकर, हरिष नैताम, वंदना मडावी, खेमदेव हस्ते, सत्तू भांडेकर , जितू निलेकार, संगीता ठलाल, मुर्लीधर खोटेले, कृष्णा कुंभारे, पुरुषोत्तम लेनगुरे, भिमानंद मेश्राम, मनिषा हिडको, पी. डी. काटकर, मनोहर दुधबावरे, चरणदास वैरागडे, प्रब्रम्हानंद मडावी, स्वप्नील बांबोळे, डॉ. शैलेंद्र भणगे,संजय बन्सल, खुशाल म्हशाखेत्री, प्रतीक्षा कोडापे, गजानन गेडाम, ज्योत्स्ना बन्सोड, अंगुलीमाल उराडे, भारती तितरे, माधुरी अमृतकर, प्रिती चहांदे, प्रमोद बोरसरे, सिध्दार्थ गोवर्धन, डॉ. चंद्रकांत लेनगुरे, मिलिंद खोब्रागडे, मधुकर दुफारे, रुपाली म्हस्के, राजरत्न पेटकर, कु. विधी बन्सोड, सुजाता अवचट इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.

     या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...