Home / विदर्भ / गडचिरोली / *मलाही थोडं समजून घ्या...

विदर्भ    |    गडचिरोली

*मलाही थोडं समजून घ्या गं...एका विधवेचं आत्मवृत्त*

*मलाही थोडं समजून घ्या गं...एका विधवेचं आत्मवृत्त*

*मलाही थोडं समजून घ्या गं...एका विधवेचं आत्मवृत्त*

 

✍️मुनिश्चर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:-मकरसंक्रांती निमित्त माझ्या सर्व माता, भगिनींना तसेच सर्वांना हार्दिक शुभेच्छा तीळगूळ घ्या आणि गोड, गोड बोला. ही म्हण प्रचलित आहे म्हणून सर्वजण याच सणाच्या निमित्ताने म्हणत असतात.  मी पण मोठ्या आनंदाने म्हणत होती कारण ते माझ्या जीवनातील गेलेले दिवस होते पण,आता मात्र  म्हणायला सुद्धा  फारशी हिमंत होत नाही. कारण आजकाल माझ्या सारख्या विधवेकडून कोणी तीळगूळ घ्यायला सुद्धा  विटाळ माणतात तर कोणी मला  अपश्यगुणी समजतात ह्या विषयी मला काहीच समजत नाही. यात माझा काय दोष आहे. ..? गेल्या काही दिवसापूर्वी  माझे पती जिवंत असताना मी सुहासिन होती तेव्हा माझ्या  मोहल्यातील  भगिणी मला दरवर्षी हळदीकुंकू, वाण घेण्यासाठी बोलवत असत, माझे नातेवाईक सुद्धा जवळ करत असत  व माझ्या घरी हळदीकुंकू, वाण घेण्यासाठी मोठ्या आंनदाने येत असत तेव्हा,मला खूप आनंद होत असे पण,गेल्या काही दिवसांपूर्वी माझे पती जग सोडून कायमचे  गेले तेव्हापासून समाजाचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आपोआप बदलून गेला, नातेवाईक बदलले  कोणत्याही धार्मिक  कार्यक्रमात मला  सहभागी करून घेण्यासाठी विचार करतात तर कोणी टोमणे मारतात. असली माणुसकी व या प्रकारची नासलेली विचारसरणी  बघून माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहत असते तर कधी खूप चिड येतो पण मी काय करू. ..? आज मी कितीही  चांगल्या प्रकारे बोलण्याचा जरी प्रयत्न  केली,रहाण्याचा प्रयत्न केली  तरी माझ्याकडे मात्र त्याच दृष्टीने बघितले जाते. विधवा महिलांविषयी समाजात बदलेले चित्र बघून मला खूप दु:ख होते. आज मकरसंक्रांतीचा दिवस आहे हा दिवस मी कधीच विसरू शकत नाही. मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी मी महिला मध्ये सहभागी व्हायची नटायची, थटायची, उखाणे घ्यायची ते गेलेले दिवस आणि आठवणी आजही माझ्या साठी ताज्या आहेत. पण,काय करू मी काहीच करू शकत नाही आठवणीमध्ये जगत असते मी एवढेच करू शकते कारण समाजात या दिवशी मला कोणीच समजून घेत नाही माझ्या भावनांची कोणी कदर करत नाही. मी कोणाला वाण मागत नाही पण,निदान या दिवशी सर्वच महिला  एकत्र जमतात आणि हळदीकुंकू, वाण देतात, घेतात मौजमजा करतात आनंदाचा क्षण आहे पण,   एका महिलेच्या मनातील भावना एक महिलाच चांगल्या प्रकारे समजू शकते. निदान या तरी कार्यक्रमात मला थोडं सहभागी करून घेतले तर थोड्या क्षणासाठी माझे दु:ख दूर जातील आणि पुन्हा एकदा नव्याने मी  जगण्याचा प्रयत्न करेन पण,असं होताना दिसत नाही. फार दु:ख होते त्यावेळी की, माणसं तर समाजात असतात पण,माणुसकी दिसत नाही म्हणून माझ्या सारख्या विधवेकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक दिसत नाही. मलाही जगण्याचा अधिकार आहे आणि मी जगण्याचा प्रयत्न करते कारण माझ्या जीवनात  आनंद कमी पण,वाटेत काटे जास्त पेरलेले असतात तरीही त्यांची जखम सहन करून मी जगत असते तरीही माझे जगणे काहींना नको असते. याच भूमीत अशा महान विभूंतीनी जन्म घेऊन स्त्रियांना सुशिक्षित केले, न्याय, हक्क मिळवून दिले आज त्या महान विभूतीची सुद्धा मी एक लेक आहे. मला अभिमान वाटतो पण,काय करू आजकालचे सुशिक्षित असताना काही लोक विधवांना त्रासून सोडतात मग हे कसले सुशिक्षित. झाले  ...?

     हा मकरसंक्रांतीचा सणच नाही तर  अशा बरेच  सणांपासून मला दूर लोटल्या जाते. मी कोणालाही आपले  गाऱ्हाणे सांगत नाही पण,हे सत्य आहे आज माझ्या सारख्या समाजात  ज्या विधवा भगिणी आहेत त्यांच्या त्यागातून सर्वजण रात्रीची सुखाची झोप घेत आहेत, पोटभर अन्न खात आहेत त्याच  महान दैवतांमुळे... तेच दैवत म्हणजेच सीमेवर लढणारे माझे वीर जवान आणि जगाला पोसणारा माझा बळीराजा होत. आज त्यांच्याच बलिदानाचा समाजाला विसर पडताना दिसत आहे.  पण,तुम्ही  नारीशक्ती आहात गं तुम्हाला तर सर्वच कळत असते मग तुम्ही  कसे काय एखाद्या विधवा भगिणीला दूर करता...? आणि कशासाठी...? आज जर तुम्हीच असे केले तर आम्हाला कोण समजून घेणार. ..? म्हणून तुम्ही असे करू नका होत असेल तर माझ्या सारख्या विधवा भगिणीला समजून घ्या, आमच्या  पाठीशी उभे रहा नक्कीच एक महिला होण्याचा तुम्हाला अभिमान वाटेल.

*सौ.संगीता संतोष ठलाल*

मु.  कुरखेडा जि.गडचिरोली

७८२१८१६४८५

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...