Home / विदर्भ / गडचिरोली / *भिमा कोरेगांव शौर्यदिन'...

विदर्भ    |    गडचिरोली

*भिमा कोरेगांव शौर्यदिन' सलामी दिल्याने वर्षभर नविन ऊर्जा मिळतो: अँड. विनय बांबोळे*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन' सलामी दिल्याने वर्षभर नविन ऊर्जा मिळतो: अँड. विनय बांबोळे*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन' सलामी दिल्याने वर्षभर नविन ऊर्जा मिळतो: अँड. विनय बांबोळे*

 

✍️ मुनिश्वर बोरकर

     गडचिरोली

 

गडचिरोली:-भिमा कोरेगांव शौर्यदिन महोत्सव कार्यक्रम व विजया स्तभाला सलामी दिल्याने वर्षभर नविन उर्जा मिळतो. दलितांवर होणार्‍या अन्याय - अत्याच्यारावर लढा देण्याकरीता एकजुट निर्माण होते म्हणुनच वैनगंगा नदि किणार्‍यावर चंद्रपूर - गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यचे बौद्ध बांधव मोठ्या संख्येने विजया स्तंभाला सलामी देण्याकरीता एकत्र येऊन त्या शुरविराचे स्मरण करतात असे मोलाचे मार्गदर्शन शेड्युल कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. विनय बांबोळे  यांनी भिमा कोरेगांव शौर्यदिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी केले. भिमा कोरेगांव शौर्यदिन महोत्सव व विजया स्तंभाला सलामी कार्यक्रम वैनगंगा नदिकिणारी व्याहाड रोडवर शेड्युल कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. विनय बांबोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाचे उदघाटक संजय दौलत मेश्राम डायरेक्टर रियलस्टॉर मार्केटिंग गडचिरोली हे होते तर दिप प्रज्वलन रिपब्लिकन पार्टी चंद्रपूर जिल्हयाचे अध्यक्ष गोपाल रायपुरे तर स्वागताध्यक्ष रिपब्लिकन पार्टी गडचिरोली जिल्हयाचे अध्यक्ष माजी प्राचार्य मुनिश्वर बोरकर हे लाभले होते. प्रमुख अतिथी म्हणुन वंचितचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष बाळू ढेभुर्णे, रिपाईचे जेष्ठ नेते एड शाताराम उंदिरवाडे , सामाजिक कार्यकर्ते नरेश महाडोरे  वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष जि. के. बारसिंगे , शेकाफेचे जिल्हाध्यक्ष पंडित मेश्राम, मिलिंद भानारकर , प्रितम साखरे , पो. पा. अनिल खेवले , अँड. चिळंगे , विलास उंदिरवाडे , मुख्याध्यापक जनबंधु आदि लभाले होते. या प्रसंगी गोपाल रायपुरे म्हणाले की , केवळ शौर्यदिन कार्यक्रमावर आपणाला थांबायचे नाही तर होणाऱ्याअन्याय अत्याचारा वर लढा देण्यासाठी आपण सज्ज झाले पाहीजे आपल्या एकजुटीची ताकद दाखविण्याची आज गरज आहे. प्रा. मुनिश्चर बोरकर यांनी ५०० महार बॅटालियनने शौर्य दाखवुन पेशव्याचा नायनाट केला. त्या शुरविराचे स्मरण म्हणुन आजचा कार्यक्रम होय. याप्रसंगी वंचितचे बाळू ढेभुर्णे म्हणाले की भिमा कोरेगांवचा शुरविरांनी तलवारीच्या जोरावर लढा देऊन पेशव्यांचा पराभव केला. आता २०२४ मधे आपण एकजुटीने मतदानाच्या जोरावरआपली ताकद दाखवायची आहे. हे काम वंचितांनी करावयाचे आहे असे सांगीतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंडित मेश्राम संचलन दिलीप गोवर्धन तर आभार अरुण शेन्डे यांनी मानले. शेड्युल कॉस्ट फेडरेशनच्या रुपेश सोनटक्के , हेमंत पा. मेश्राम , एन.पी. लाळे , विनोद जांभुळकर. शरद लोणारे , निलकंठ सिडाम , अमोल मेश्राम  चेतन सहारे संघरत्न निमगडे , सुमित्रा राऊत  आदि कार्यकार्यकर्त्याचे मोलाचे सहकार्य केले. रात्रौ भोजनदान नंतर भिम गिताचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील बौद्ध बांधवांचा तोबा गर्दी जमली होती.

ताज्या बातम्या

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...