Home / विदर्भ / गडचिरोली / *बौद्ध बांधवाची दिशाभुल...

विदर्भ    |    गडचिरोली

*बौद्ध बांधवाची दिशाभुल करणाऱ्या तथाकथीत आंबेडकरी नेत्यापासुन सावध रहावे* *बौद्ध बांधव नवरगांव. आवाहन*

*बौद्ध बांधवाची दिशाभुल करणाऱ्या तथाकथीत आंबेडकरी नेत्यापासुन सावध रहावे*  *बौद्ध बांधव नवरगांव. आवाहन*

*बौद्ध बांधवाची दिशाभुल करणाऱ्या तथाकथीत आंबेडकरी नेत्यापासुन सावध रहावे*

बौद्ध बांधव नवरगांव. आवाहन

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:-12/11/2023 -मौजा नवरगाव तहसील चामोर्शी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील नामकरण फलकाचा वाद सद्या विकोपाला गेलेला आहे. सन 2022 मध्ये नवरगांव येथील ग्रामसभेने बहुमतांनी ठराव पारित करून बौद्ध मोहल्यातील चौकास डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव दिले. त्यानुसार बौद्ध समाज नवरगाव यांनी प्रस्तुत चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असे फलक उभारले. जातीयवादी मानसिकतेतून काही समाज कंटकांनी सदर फलकास विरोध करून प्रशासनकरवी सुमारे २०० पोलीसांच्या ताफ्यात सदर फलक काढण्यात आला. नवरंगाव बौद्ध बांधवानी रिपाई नेते एड. विनय बांबोळे , प्रा. मुनिश्चर बोरकर  गोपाल रायपुरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक गडचिरोली यांची भेट घेऊन प्रकरणाचे गांभीर्य पटवून दिले. परंतु ग्रामसभेनी पारित केलेला ठराव नविन ग्रामसभेचा ठराव घेऊन रद्द करण्याच्या हालचाली सुरु झाल्याने अँड. विनय बांबोळे यांच्या मार्फतीने चामोर्शी न्यायालयात प्रकरण दाखल केले. न्यायालयाने प्रकरणाचे गार्भीय लक्षात घेऊन प्रकरण थैसे थे ठेवण्याचे आदेश दिलेत. प्रस्तुत प्रकरणात मागील तीन महिन्यापासुन स्टे आहे. मात्र गावठाण जागेवर दुर्गे यांच्या घरासमोर लावलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा दुसरा फलक गावकऱ्यांनी ग्रामपंचायत मार्फतीने दि. ७ नोव्हेंबरला सुचना पत्र काढून पोलिसांना माहीती देवून फलक काढुन टाकण्याच्या हालचाली सुरू केल्यात. दि. ९ / ११ ला कोर्टाने सुनावनी घेतली. कोर्टाने दोन्ही समाजाची बाजू ऐकुन स्थगनादेशाची मुदत दि. २७ नोव्हेंबर पर्यत वाढवून दिली. परंतु संवर्णाच्या रेट्याने व भाजपाच्याआमदारांच्या सहकार्याने जातीयवादी राजकारण्यांनी हस्तक्षेप केल्याने प्रशासक दि. १० नोंव्हेबरला पहाटेलाच गडचिरोली , चामोर्शी व पोटेगांव पोलिस ताफ्यासहीत फलक हटविण्यासाठी नवरगांवात धडकले. प्रा. बोरकर एड विनय बांबोळे वगळता बौध्दाचा कोणताही पुढारी यापूर्वी त्या गावात आला नाही.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने लावलेला फलक वारंवार सवर्णांच्या सागण्यावरून प्रशासक हटवित असेल तर या गावात राहुन आमचा काय उपयोग म्हणुन नवरगाव बौद्ध बांधव आपापल्या बैल बंड्यावर सामान बांधुन गाव सोडण्यास निघाले असता शेवटी SDPO भुजबळ गडचिरोली यांनी बौध्द बांधवांची समजुत घातली व कोर्टाचा स्टे असेपर्यत फलक हटविता येणार नाही असेही सवर्णाना सांगुन पोलीस प्रशासक माघारी फिरले. दुसरे दिवशी दि. ११ / ११ ला अभारिप चे उपाध्यक्ष रोहिदास राऊत , ग्रामसेवक देवानंद फुलझेले , सेवानिवृत गौतम मेश्राम , BRsp चे माजी जिल्हाध्यक्ष राज बन्सोड ' कांग्रेस सेल चे लहुजी रामटेके , अभारिपचे कार्यकर्ते प्रदिप भैसारे , प्लॉट विक्री एजन्ट नागसेन खोब्रागडे आदि प्रशिद्धीस हपापलेले नेते नवरगांव बौद्ध बांधवाचे प्रकरण ऐकुन विहारात फोटो काढून रोहिदास राऊत यांच्या सांगण्यावरून राज बन्सोड यांनी whats up ग्रुप वर नवरगांव प्रकरण आमच्या मध्यस्थीने मिटले. अशी बातमी प्रकाशित केली व प्रकरणाची सत्यता दडपण्याचा प्रयत्न केला. प्रकरण कोणत्याही सामंजस्याने मिटलेले नसुन कोर्टाच्या दणक्याने थांबले आहे. मात्र भाजप आमदाराच्या ईशार्यावर त्यांच्या हातचे बाहुले बनून व समाजाची दिशाभूल करून प्रकरणाची धार बोथट करण्याचा प्रयत्न वरील कार्यकत्यांनी चालविला आहे.  ग्रामसभेच्या ठरावानुसार संविधान क त्याच्या नावाने लावलेला चौकातील फलक पुन्हा त्याच ठिकाणी लावण्यास संवर्णाची सहमती असेल तर आम्ही कोर्टाची केसेस मागे घेवू असे कविश्वर झाडे व डॉयमंड वाकडे यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलतांना सांगीतले . परंतु प्रकरण मिटलेच नाही. त्यामुळे अश्या बौद्ध नेत्यापासुन समाजाने सावध राहण्याचे आवाहन नवरगांव बौद्ध बांधवानी दिलेल्या प्रशिद्ध पत्रकाद्वारे केलेला आहे. या उलट वंचितचे बाळू ढेभुर्णे , जि. के. बारसींगे रिपाई नेते मानिकराव तुरे व बसपाचे मंगेश बोरकुटे , योगीराज कन्हाडे गोंदिया आदि नेत्यांनी नवरगांव बौध्द बांधवाची भेट घेवून प्रकरणाची सत्यता जाणून याबाबत जिल्हाधिकारी गडचिरोली यांना भेटून निवेदन देऊन सदर प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केलेली आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...