Home / विदर्भ / गडचिरोली / *अंगणवाडी सेविकांनी...

विदर्भ    |    गडचिरोली

*अंगणवाडी सेविकांनी घेतले जादूटोणाविरोधी कायद्याचे प्रशिक्षण.*

*अंगणवाडी सेविकांनी घेतले जादूटोणाविरोधी कायद्याचे  प्रशिक्षण.*

*अंगणवाडी सेविकांनी घेतले जादूटोणाविरोधी कायद्याचे  प्रशिक्षण.*

 

✍️मुनिश्वर बोरकर

    गडचिरोली

 

गडचिरोली:-जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी नागपूर यांच्या आदेशानुसार महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडी सेविकांसाठी  जादूटोणाविरोधी कायदा पहिले प्रशिक्षण कार्यक्रम  कामठी पंचायत समिती च्या सभागृहात आयोजित केले होते .त्यासाठी शासनाने महा.अनिस चे राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे यांना जिल्ह्यातील सर्वच अंगणवाडी सेविकांना क्रमाक्रमाने  प्रशिक्षण देऊन समाजात जादूटोणाविरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भात जनजागृती करण्याचे आवाहन केले . त्यामुळे पहिल्याच प्रशिक्षण कार्यक्रमाला अंगणवाडी सेविकांनी प्रचंड गर्दी केली होती.दुर दुरच्या खेड्या पाड्यातून आलेल्या तब्बल 119 अंगणवाडी सेविकांनी सभागृह खचाखच भरलेला होता. जिल्हा कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे यांनी संविधान प्रास्ताविका उपस्थितांच्या तोंडी वदवून कार्यक्रमाची शुरुवात केली. देवानंद बडगे यांनी चळवळीचे ' विज्ञान गीत ' सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली.त्यानंतर रा.का सदस्य रामभाऊ डोंगरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली .या प्रसंगी जादुटोणा विरोधी कायदा म्हणजे काय,तो  कसा लागू होतो, कायद्याचे प्रावधान व कलमें काय ,याचे सविस्तर प्रशिक्षण चित्रपोस्टर सहीत चित्तरंजन चौरे जिल्हा कार्याध्यक्ष यांनी समजावून सांगितले.त्यानंतर जादुटोणा चे प्रत्यक्ष चमत्कार सादरीकरण उ.ना शाखेचे कार्याध्यक्ष देवानंद बडगे व रामभाऊ डोंगरे यांनी संयुक्तपणे सादर केले ,तेव्हा अंगणवाडी सेविका अक्षरशः भारावून गेल्या होत्या. प्रत्येकांनी सदर प्रयोगा मागील खरं विज्ञान समजून घेतलं व आपापल्या कार्यक्षेत्रात जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार व अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा निर्धारच केला. अंधश्रद्धा निर्मूलना बाबतीत उपस्थितांच्या सर्व  प्रश्नांचे निराकरण रामभाऊ डोंगरे यांनी केले.कार्यक्रमाला पर्यवेक्षिका वैशाली खोत, माधुरी कोल्हे, तेजल रच्छोरे, तसेच जिल्हा प्रधान सचिव कल्पना लोखंडे , सा. का.अशोक राऊत उपस्थित होते. " मानसाने मानसाशी मानसासम वागणे" या सामुहिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.संचालन चित्तरंजन चौरे तर  आभार माधुरी कोल्हे यांनी मानले.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...