Home / विदर्भ / गडचिरोली / *गडचिरोलीची माती राजधानी...

विदर्भ    |    गडचिरोली

*गडचिरोलीची माती राजधानी दिल्लीत देणार आपलेपणाची भावना- खा.अशोक नेते*

*गडचिरोलीची माती राजधानी दिल्लीत देणार आपलेपणाची भावना- खा.अशोक नेते*

*गडचिरोलीची माती राजधानी दिल्लीत देणार आपलेपणाची भावना- खा.अशोक नेते*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:-बारा तालुक्यातील अमृत कलशांचे सामूहिक पुजनदि.२५ ऑक्टोंबर २०२३गडचिरोली : देशाच्या जडणघडणीत अनेक महान लोकांनी प्राणाची आहुती दिली. त्यांच्या स्मृति जपण्यासाठी, तसेच विविधतेने नटलेल्या या देशाच्या समृद्धतेची साक्ष देणारी अनेक भागातील माती, श्रद्धास्थान असणाऱ्या धार्मिक स्थळांची माती अमृत कलशाच्या माध्यमातून देशाची राजधानी नवी दिल्लीत गोळा केली जात आहे. तेथील अमृत वाटीका बगिच्यात या मातीचा सुगंध दरवळून तो सर्वांना आपलेपणाची भावना देईल, असा विश्वास खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केला.जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील धार्मिक स्थळांमधील मातीने भरलेले अमृत कलश बुधवारी गडचिरोलीत एकत्रित करून त्यांचे पूजन करण्यात आले,मेरी माटी, मेरा देश या माध्यमातून देशप्रेम, देशभावना,जागृत करत  खऱ्या अर्थाने  देशाला एकत्रीत करण्याचं काम देशाचे लोकप्रिय लाडके पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी जी करत आहेत. त्याप्रसंगी खा.नेते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या या  कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले होते.  'माझी माती, माझा देश' या उपक्रमांतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक तालुक्यातील महत्वाच्या धार्मिक स्थळावरून गोळा केलेली  माती या कलशात गोळा केली होती.  सर्वप्रथम शहीद भगतसिंग आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून  या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी डॅा.बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद संकुल शाळा, कॉम्प्लेक्स या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्याने वाजतागाजत १२ कलश नियोजन भवनात पोहोचविण्यात आले.याप्रसंगी धरती मातेचरणी पंचप्राण शपथ घेतली.    कार्यक्रमाचे प्रास्ताविक गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर तर उत्कृष्ट संचालन संध्या चिलमवार यांनी केले.याप्रसंगी मंचावर प्रामुख्याने भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र भुयार, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक अमित फुंडे, चंद्रपूर ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, न.प.उपमुख्याधिकारी भांडारकर, तसेच १२ तालुक्यातील गटविकास अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...