वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
गडचिरोली :
गोंडवानाच्या स्वातंत्र्यासाठी जिवाचं रान करुन वयाच्या २५ व्या वर्षी शहीद झालेल्या चांदागड च्या सुपुत्राची, आदिवासी गोंडराजाची शौर्यगाथा असलेल्या "गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकाचा प्रयोग दि . २१ ऑक्टोंबर २०२३ ला दु . २ वा. चंद्रपूर येथील महाकाली महोत्सवात भव्य दिव्य स्वरुपात सादर होत असून रसिक प्रेक्षक मोठ्या उत्साहाने या नाटकाच्या प्रयोगाची वाट पाहत आहेत.
झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपूरे यांनी या नाटकाचे लेखन केलेले असून, प्रसिद्ध गायक, दिग्दर्शक व निर्माता अनिरुद्ध वनकर यांनी त्यांच्या लोकजागृती संस्था, चंद्रपूर च्या वतीने या नाटकाची निर्मिती केली आहे.
सिनेस्टार मुन्ना बिके, निखिल मानकर, राजरत्न पेटकर, संजीव रामटेके, सुरज चौधरी, गुरू मोहूर्ले, अविनाश कडूकर, अमित दुर्गे, यश शेंडे, वेदांत मेहता, अंकुश शेडमाके, भाष्कर मडावी, शुभम गुरनुले, गणेश मडावी, मयुर मस्के, अनुराग मुळे, स्नेहल वाडगुरे इ. पुरुष कलावंत आणि करिश्मा मेश्राम, रुपाली खोब्रागडे, नयना खोब्रागडे, प्रियंका सिडाम, माधुरी ढोरे, मनिषा बावणे, प्रविण लाडवे, संजना येलेकर, राजश्री, स्मिता, भावना इत्यादी स्त्री कलावंतांसह नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली यांचे "नाट्य प्रशिक्षण शाळेत" प्रशिक्षीत ३५ कलावंत भुमिका करीत आहेत. रेला नृत्य, आकर्षक प्रकाशयोजना व पार्श्वसंगीत या नाटकाचे खास आकर्षण आहे. प्रत्यक्ष रंगमंचावर साकारणारे क्रांतियुध्द अंगावर रोमांच उभे करणारे आहे.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...