Home / विदर्भ / गडचिरोली / *जागतिक सेवा सप्ताह...

विदर्भ    |    गडचिरोली

*जागतिक सेवा सप्ताह निमित्त लायन्स क्लब गडचिरोली तर्फे अनेक उपक्रमाचे आयोजन*

*जागतिक सेवा सप्ताह निमित्त लायन्स क्लब गडचिरोली तर्फे अनेक उपक्रमाचे आयोजन*

*जागतिक सेवा सप्ताह निमित्त लायन्स क्लब गडचिरोली तर्फे अनेक उपक्रमाचे आयोजन*

 

✍️मुनिश्वर बोरकर

    गडचिरोली

                                                              गडचिरोली:-दरवर्षी  ऑक्टोबर महिन्यात जगभरात लायन्स क्लब इंटरनॅशनल  च्या वतीने  जागतिक सेवा सप्ताह विविध  कार्यक्रमांनी साजरा केला जातो. या निमित्ताने लायन्स क्लब गडचिरोली तर्फे सुद्धा अनेक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.                                                                माध्यमिक आश्रम शाळा गिरोला येथे शांतता रॅली, निबंध स्पर्धा व ग्रामसफाई करण्यात आली .तसेच  मुख्याध्यापक श्री बावणे  माध्यमिक आश्रम शाळा गिरोला यांच्यातर्फे मुलींना इन्सुलेटर वाटप करण्यात आले .  आरोग्य शिबीर अंतर्गत रक्तदान शिबिर तसेच बी पी, शुगर  चेकअप कॅम्प घेण्यात आला .त्यामध्ये लायन्स क्लब सदस्य व इतर असे मिळून १५ लोकांनी रक्तदान केले.

 नेत्रदान व नेत्र चिकित्सा या कार्यक्रमा अंतर्गत प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट शहरातील सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ  डॉ. अद्वय अप्पलवार यांनी  मार्गदर्शन केले .तसेच लायन्स क्लब च्या 15 सदस्यांनी मरणोपरांत नेत्रदान करण्याचा संकल्प केला.  पर्यावरण संरक्षण व साफसफाई याअंतर्गत चांदाळा गावातील बचत गट महिलांनी लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसफाई केली व पर्यावरणाचे महत्त्व समजून घेतले.दंत चिकित्सा व चाइल्डहूड कॅन्सर चे आयोजन अनुदानित आश्रम शाळा मुरमाडी येथे करण्यात आले .  आदिवासी महिलांना अर्थसहाय्य मिळण्यासाठी मार्गदर्शन अनुदानित आश्रम शाळा चांदाळा येथे करण्यात आले .यावेळी अनुदानित आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ यशोधरा उसेंडी यांनी मार्गदर्शन केलं. तसेच महिला सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मसाला भात व जिलेबी चे वाटप करण्यात आले. यावेळी 650 रुग्णांनी व नातेवाईकांनी याचा लाभ घेतला. अशाप्रकारे ऑक्टोंबर जागतिक सेवा सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताह निमित्त लायन्स क्लब गडचिरोलीचे अध्यक्ष श्री सतीश पवार, सचिव श्री किशोर चिलमवार, कोषाध्यक्ष नितीन चंबुलवार ,ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब पद्मावार, भुजंग हिर सुरेश लडके , शेषराव येलेकर , महेश बोरेवार, शेमदेव चापले , नादीर भामानी ,परविन भामणी , प्रा.संध्या येलेकर ,  सुनील देशमुख  ,मदत  जीवांनी,  प्रभू सादंमवार ,  प्रा.सविता सादंमवार  ,स्मिता लडके   ,देशमुख मॅडम, गिरीश कुकडपवार, ममता कुकडपवार , सोमनकर मॅडम, वरखेडे मॅडम ,स्वाती पवार , इंजि. पुरुषोत्तम वंजारी  व मॅडम तथा सर्व लायन सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...