Home / विदर्भ / *देसाईगंज सामाजिक वनीकरण*...

विदर्भ

*देसाईगंज सामाजिक वनीकरण* *विभागाच्याअंतर्गत येणाऱ्या देसाईगंज* *कुरखेडाआरमोरी व कोरची तालुक्यातील पूर्वी झालेल्या* *व हल्ली सुरू असलेल्या* *वृक्ष लागवडीच्या साईटवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार*

*देसाईगंज सामाजिक वनीकरण* *विभागाच्याअंतर्गत येणाऱ्या देसाईगंज*    *कुरखेडाआरमोरी व कोरची तालुक्यातील पूर्वी झालेल्या*  *व हल्ली सुरू असलेल्या*  *वृक्ष लागवडीच्या साईटवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार*

*देसाईगंज सामाजिक वनीकरण* *विभागाच्याअंतर्गत येणाऱ्या देसाईगंज*

 

*कुरखेडाआरमोरी व कोरची तालुक्यातील पूर्वी झालेल्या*

*व हल्ली सुरू असलेल्या*

*वृक्ष लागवडीच्या साईटवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार*

 

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

गडचिरोली:-  देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागा अंतर्गत येणाऱ्या देसाईगंज कुरखेडा आरमोरी कोरची तालुक्यातील पूर्वी झालेल्या भ्रष्टाचारा झाला असल्याने संपूर्ण भ्रष्टाचारा संदर्भात २ मे २०२३ व ३ ऑगस्ट २०२३ रोजी सत्यवान रामटेके यांनी देसाईगंज तहसील कार्यालया समोर दोनदा

आमरण उपोषण केला होता.दोनदा आमरण उपोषण केल्या नंतर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागा तर्फे लिखित पत्र देण्यात आले.मात्र अजून पावेतो कुठल्याही प्रकारची चौकशी वा कार्यवाही करण्यात आली नसल्याने परत पुन्हा तिसऱ्यांदा आज २५ सप्टेंबर २०२३ पासून सर्वप्रथम दोषींवर कारवाई करण्या संदर्भात गडचिरोली मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर रामटेके यांनी आमरण उपोषण सुरू केला आहे.

देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागा अंतर्गत येणाऱ्या चारही तालुक्यात ३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजना व इतर योजने अंतर्गत करोडो रुपयांची कामे करण्यात आली.मात्र झालेल्या कामांवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे.वृक्ष लागवडीच्या साईटवर वृक्षां सभोवताल कुंपण नाही,माहितीचे फलक(बोर्ड)नाही,विविध प्रजातींचे वृक्ष लागवड नाही,काही अंतरावर वृक्षेच दिसून येत नाही.सदर सर्व बाबींची तरतूद अंदाजपत्रकामध्ये असतांनाही नियमबाह्य कामे करून शासनाच्या लाखो रुपयांना चुना लावल्या गेला आहे.रस्ता दुतर्फा तसेच गट लागवडीच्या कित्तेक साईटवर जिवंत रोपांची टक्केवारी कमी असतांना सुद्धा जिवंत रोपांची टक्केवारी जास्त दाखवून निधीची मागणी करून शासनाचे लाखो रुपये हडप करण्यात आले आहे.वारंवार चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सत्यवान रामटेके करीत असतांनाही टोलवा-टोलवी करून सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकारी,कर्मचारी वर्गांकडून वृक्ष लागवडीवर झालेल्या भ्रष्टाचारा संदर्भात वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे.यामध्ये कार्यरत असलेले तत्कालीन विभागीय वन अधिकारी भडके,विभागीय वन अधिकारी मनोज चव्हाण व देसाईगंज (वडसा)सामाजिक वनीकरण विभागाचे तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी हिरा बारसागडे यांना गडचिरोली सामाजिक वनिकरण कार्यालयाकडून शह देण्याचा प्रकार दिसून येत आहे.

वरिष्ठांच्या संमतीशिवाय कनिष्ठ कुठलेही पाऊल उचलूच शकत नसल्याने सर्वप्रथम वरिष्ठांवर कारवाई होणे आवश्यक आहे.

       सत्यवान रामटेके

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

विदर्भतील बातम्या

वर्धा जिल्ह्यात भाजपाचे संघटनकार्य प्रशंसनीय : डॉ. अशोक जीवतोडे

वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...