Home / विदर्भ / गडचिरोली / *पयडी गाव एटापल्ली तालुक्यातून...

विदर्भ    |    गडचिरोली

*पयडी गाव एटापल्ली तालुक्यातून वगळून गडचिरोली तालुक्यात समाविष्ट करावे* *ग्राम सभेची मागणी. पुणे करार धिक्कार दिन साजरा*

*पयडी गाव एटापल्ली तालुक्यातून वगळून गडचिरोली तालुक्यात समाविष्ट करावे*    *ग्राम सभेची मागणी. पुणे करार धिक्कार दिन साजरा*

*पयडी गाव एटापल्ली तालुक्यातून वगळून गडचिरोली तालुक्यात समाविष्ट करावे*

 

ग्राम सभेची मागणी. पुणे करार धिक्कार दिन साजरा

 

✍️मुनिश्वर बोरकर

    गडचिरोली

 

गडचिरोली:-एटापल्ली तालुक्यातील पयडी येथे पुणे करार धिक्कार दिना निमित्य बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सल्लागार राष्ट्रीय आदिवासी एकाता परिषद चें नितिन पदा ' हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन रिपाईचे जिल्हा अध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , जिल्हा प्रभारी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद चे भोजराज कान्हेकर , ज्ञानेश्वर  मुजंमकार , उपसरपंच महादेव पदा , आदि लाभले होते. याप्रसंगी मुनिश्वर बोरकर म्हणाले की ' पयडी गाव हे एटापल्ली तालुक्यात ५२ कि.मी. अंतरावर आहे. तर गडचिरोली तालुकाचे अंतर ४२ कि. मी. अंतरावर असुन  पयडी ची बाजारपेठ पोटेगांव व गडचिरोली आहे. एटापल्ली हे पयडीसाठी तालुका पुरती मर्यादित अतिदुर्गम भाग आहे. तेव्हा पयडी गांव हे गडचिरोली तालुक्यात समाविष्ट करावा अशी मागणी शासनाकडे रेटून धरण्यात येइल. याप्रसंगी कान्हेकर सर म्हणाले की , पुणे करारामुळे आमचे जे खासदार- आमदार निवडून जातात ते ज्या समाजातून निवडून जातात त्या समाजाचे नेतृत्व न करता. पार्टीचेच बाजु घेतात. म्हणुन डॉ. बाबासाहेबांनी म्हटले होते की , मला संसदेतील खांबाला लटकवून फॉसी घ्या पण मी पुणे करारावर सही करणार नाही. म्हणुन आज पुणे करार धिक्कार दिन साजरा करण्याची वेळ आली. U CC कायदा रद्द करण्यात यावा. आदिवासीचा वनहक्क 2023 चा कायदा रद्द करण्यात यावा. महिला आरक्षणात आदिवासींच्या महिलांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे असेही कान्हेकर यांनी सागीतले. मुजमकार यांनी म्हटले की, आज देशात संविधान आहे. म्हणुन आमचे हक्क व अधिकार अबादित आहेत. म्हणुन संविधानाचे संरक्षण करणे सर्वाची जबाबदारी आहे. बैठकीला सचिव दिनेश वट्टे  सोनु नरोटे ' वासुदेव होळी  लालसु वड्डे , सुधाकर होळी , लालु पदा , गजु मडावी, हरिदास होळी  नागसु वड्डे , दिपक पदा,सहीत बहुसंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...