वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
गडचिरोली : राज्यात मराठा आंदोलकांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी राज्य शासनाकडे लावून धरली आहे. ही मागणी कुणबी समाजावर अन्याय करणारी असून मराठ्यांचे ओबिसीकरण करणारी आहे. ओबिसीमध्ये आधीच ३५० हून अधिक जातीचा समावेश आहे. त्यामुळे या प्रवर्गात समावेश असलेल्या अनेक घटक जातींवर अन्याय होत आहे, अशा परिस्थितीत मराठा समाजाचे ओबिसीकरण झाले तर ओबिसीमध्ये समावेश असलेल्या इतर समाजावर मोठा अन्याय होणार आहे. त्यामुळे मराठ्यांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीचा विरोध दर्शविण्यासाठी सोमवार, १८ सप्टेंबरला तालुका व जिल्हा स्तरावर तहसील/ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून करुन शासनाला निवेदन दिले जाणार आहे. यानंतर ५ ऑक्टोबरला दुपारी १ वाजता कुणबी समाजाच्या वतीने महामोर्चा काढण्यात येईल, असा निर्णय नुकत्याच पार पडलेल्या कुणबी सेवा समितीच्या सभेत घेण्यात आला.
राज्यात मागील काही वर्षांपासून मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. न्याय हक्कासाठी लढा देणे हा प्रत्येकांचा अधिकार आहे. मात्र, यावर्षी मराठा समाजाच्या आंदोलनातून थेट मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. ही मागणी कुणबी समाजाचे प्रमाणपत्र घेऊन ओबिसी आरक्षणाचा लाभ मिळवणारी आहे. सरळसरळ एक प्रकारे मराठ्यांना ओबिसीमध्ये समावेश करावा, असाच अर्थ निघत असल्याने त्या मागणीचा विरोध दर्शविण्यासाठी कुणबी सेवा समितीच्या वतीने टप्प्या टप्प्यात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १२ तालुका स्तरावर सोमवार, १८ सप्टेंबरला तहसीलदार यांच्या मार्फतीने राज्य शासनाला निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर ५ ऑक्टोबरला जिल्हा पातळीवर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या होणाऱ्या आंदोलनात समाज बांधवांसह ओबीसींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कुणबी सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...