Home / विदर्भ / गडचिरोली / *राष्ट्रीय मूलनिवासी...

विदर्भ    |    गडचिरोली

*राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे ६२००० शाळा खाजगी कंत्राटदारांना विकण्याच्या निर्णयाविरोधात धरणे आंदोलन*

*राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे ६२००० शाळा खाजगी कंत्राटदारांना विकण्याच्या निर्णयाविरोधात धरणे आंदोलन*

*राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे ६२००० शाळा खाजगी कंत्राटदारांना विकण्याच्या निर्णयाविरोधात धरणे आंदोलन*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

 

गडचिरोली :-राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ व प्रोटानच्या वतीने महाराष्ट्रातील ३६ जिल्हे व ३५८तालुक्यात जिल्हा परिषद शाळा व नगरपरिषद शाळा खाजगीकरण करण्याच्या निर्णयाविरुद्ध धरणे आंदोलन करून तहसीलदार व जिल्हाधिकारी मार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

        राज्य सरकारने ६ सप्टेंबरला  सरकारी व नगरपरिषद च्या ६२००० शाळा ९ खाजगी कंपन्यांना विकण्याचा आदेश काढला .जर शिक्षणाचे खाजगीकरण केले  तर उद्योगपती व भांडवलदार शिक्षणाचे वाटोळे व सत्यानास केल्याशिवाय राहणार नाही. शिक्षक भरती ठेकेदारी पद्धतीने करतील .  शिक्षकांना कमी पगारावर गुलामासारखे वागवतील. कधीही नोकरीतून काढून देतील. शिक्षण फी महागडी करतील .त्यामुळे गरिबांची मुले शिकणार नाहीत . संविधानानुसार प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असून सुद्धा सरकारने शिक्षणाचे व्यापारीकरण व खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे . या विरोधात हे धरणे आंदोलन करण्यात आले आहे.

       तसेच आदिवासी विकास विभागामार्फत १९७२ पासून आश्रम शाळा चालू आहेत. परंतु आज आश्रम शाळा व वस्तीगृह यांची फार वाईट अवस्था दिसून येत आहेत . इमारती पडक्या झालेल्या आहेत .कर्मचाऱ्यांची भरती नाही. अनेक आश्रम शाळेत साप विंचू चावून विद्यार्थी मृत्यू पावतात . त्यामुळे आश्रम शाळांची सुधारणा करावी. तसेच शिक्षक भरती सुद्धा करावी . शाळेच्या वेळापत्रकात बदल करून सकाळी ८:४५ मिनिटांपासून शाळा सुरू करण्याचा आदेश काढला. तो बंद करावे .आश्रम शाळेत निवासाची सोय नसताना कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचा आग्रह धरणे. दहावी बारावीच्या निकालावर कर्मचाऱ्यांची वेतन वाढ रोखून ठेवणे .कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा अदा न करणे. वेतन देयकावर संस्था चालकाची सही करण्याच्या आग्रह धरणे .अतिरिक्त शिक्षकांना काम नाही तर वेतन नाही हा जाचक नियम लागू करणे. वीस ते तीस वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांना क्षमता चाचणी देण्याचा आदेश काढणे. इत्यादी निर्णयाविरुद्ध हे धरणे आंदोलन करण्यात आले .

     निवेदन देतेवेळी पुंडलिक शेंडे ,भोजराज कानेकर , प्रमोद बांबोळे ,प्रमोद राऊत ,यज्ञराज जनबंधू , प्रदीप सेलोकर ,नरेश बांबोळे शांतीलाल लाडे , आनंद अलोणे, जनार्धन  ताकसांडे,सुरेश नाईक ,नरेश आत्राम , तेजकिरण उराडे , अनिल मेश्राम ,तुळशीराम कराडे ,ताराचंद आकरे, मुक्तेश्वर खोब्रागडे, पवन गणवीर , कल्पना लाडे ,तुळशीराम सहारे ,ज्योती आत्राम , प्रेमदास रामटेके , प्रभाकर जनबंधू  उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...