वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती च्या वतीने कोटगुल येथील आश्रम शाळेत बुवाबाजी , अनिष्ठ रुढी परंपरा , अंधश्रध्दा , ढोंगीबुवा ' विरोधी कायदा २०१३ अर्तगत कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाची सुरूवात पाण्याने पेटविलेला दिवा तेलाविना कसा पेटतो याचे प्रात्याक्षिक भगवान रणदिवे , राज्य बुवाबाजी संघर्ष समिती सदस्य यांनी करून दाखविले. तर राज्य कार्यकारणी सदस्य रामभाऊ डोंगरे नागपूर यांनी परिचय देवून प्रास्ताविकात बुजा बाजीवर सांगीतले की खेळ्या- पाळ्यात व जंगलात बरेच ढोंगी बाबा बसले आहेत. ते आदिवासी बांधवाची फसवणूक करतात अश्या व्यक्तीपासुन आपण सावध राहीले पाहीजे असे सांगीतले. याप्रसंगी राज्य कार्यकारणी सदस्य नंदिनी जाधव यांनी अंगात देवी येणे , भुत बादा होणे ' धागे दोरे बाधणे ' पाणी भारून देणे आदि ढोंगी बाबा करतात. डॉ. नरेंद्र दाभोडकर यांच्या मृत्यु स्थळ पुणे येथून अंधश्रध्दा निर्मूलन यात्रा निघाली आहे. ती ९० दिवश विदर्भात फिरणार आहे. आतापर्यत १२०० केसेस झाल्या आहेत. जर कुणी बुवाबाजी करीत असेल अश्या लोकावर महाराष्ट्र बुवाबाजी अंतर्गत कायदा २०१३ नुसार जेलची हवा खावी लागेल. अश्या ढोंगी बाबाला पकडण्यासाठी आपले पोलीस खाते सर्तक राहीले पाहीजे. आपणही सहकार्य करावे अशी माहीती दिली. याप्रसंगी कोटगुल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमास पोलीस उपनिरिक्षक गणेश यालमार , सरपंच राजेश नैताम , ठाण्याचे पोलीस शिपाई , तमसुचे कार्यकर्ते व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , विधार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...