आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची मागणी, उपविभागीय पोलिस अधिकारी व शहर ठानेदार यांना निवेदन
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*
*कारंजा (लाड):* लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार ओळखला जातो.पत्रकार सातत्याने समाजातल्या उपेक्षित व दुर्लक्षित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. जयस्तंभ चौक कारंजा येथे अवैध धंदे सुरू असल्याचे बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ इंगोले यांना माहिती होताच ते त्या ठिकाणी जाऊन त्या दुकानाचा फोटो काढत होते, त्यादरम्यान तेथील उपस्थितांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. सदर हल्ल्याचा सर्व पत्रकार बांधवांना निषेध करून दिनांक 29 ऑगस्ट 2023रोजी कारंजा शहरचे ठाणेदार व दिनांक 30 ऑगस्ट रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा यांना निवेदन देऊन पत्रकार हल्ल्याचा निषेध केला व हल्ला करणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी जयस्तंभ चौकातील वरली मटका व अवैद्य धंद्याची बातमी घेण्यासाठी बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ इंगोले गेले असता तेथे उपस्थित लोकांनी बंडूभाऊ इंगोले यांच्यावर भ्याड हल्ला केला.यापूर्वी सुद्धा बातमी घेण्यासाठी गेलेल्या प्रतिनिधींना गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. अशा प्रकारे पत्रकारावर होत असलेले हल्ले कोणाच्या आशीर्वादाने होत आहे?असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे त्या हल्ल्यातील हल्लेखोर शोधून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कार्यवाही करावी व कारंजा तालुक्यातील व शहरातील सर्व अवैध धंदे बंद करावे अन्यथा पत्रकार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, तसेच बंडूभाऊ इंगोले यांच्या जीवितास काही झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी हे पोलीस प्रशासनाची व अवैध धंदे करण्याची राहील अशा आशयाचे निवेदन 29 ऑगस्ट2023 रोजी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व 30 ऑगस्ट रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा यांना निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
सदर निवेदन देतेवेळी कारंजा तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते. त्यामध्ये बंडूभाऊ इंगोले, हमीद शेख,सुनील फुलारी, मोहंमद मुन्नीवाले ,सतीश शर्मा,आशिष धोंगडे, सलीम खान शेर खान, राजेश वानखड़े,पवन कुमार कदम, उल्हास ठाकरे, साजिद शेख, सय्यद आसिफ, गालीब पटेल, दामोदर जोंधळेकर, ज्ञानेश्वर वरघट, कालुबाई तवगड, दिगंबर सोनोणे, शेषराव वरठी, गजानन टोम्पे,मयूर राऊत ,उषाताई नाईक, सुनिता डोईफोडे, मोनाली गणवीर,अब्रार पठाण, सागर राणा अंभोरे, विजय भड, रहीम गारवे, इस्माईल बेनीवाले,मंगेश बाबरे, नरेंद्र बोरकर, हाफिज शेख, रमेश देशमुख, विजय खंडार, राजेंद्र श्यामसुंदर,प्रकाश राठोड, सुधाकर गर्जे, प्रा.कृष्णकुमार लाहोटी,प्रा.दिनेश रघुवंशी,संदीप कुरहे,निलेश मूंदे आदि पत्रकार बांधव उपस्थित होते.
*प्रतिक्रिया-दिनेशचंद्र शुक्ला कारंजा शहर ठाणेदार*
दिनांक 29 ऑगस्ट रोजी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातील हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.आमचे पोलीस उपनिरीक्षक रेघीवाले सदर प्रकरणाचा तपास करत आहे. लवकरच आरोपींना शोधून गुन्हे दाखल करण्यात येईल व शहरातील अवैद्य धंदे बंद करण्यात येतील.
बॉक्स
शहरात प्रचंड प्रमाणात अवैध्य धंदे वाढलेले असून या वाढलेल्या धंद्यासाठी जबाबदार कोण ?यासाठी संबंधित यंत्रणा आणि पोलीस प्रशासन या अवैध धं्यांना पाठीशी घालीत असल्याने हे याची हिम्मत वाढलेली आहे त्यामुळे आता हल्लेखोर असलेल्या ना तत्काळ शासन होणे गरजचे आहे पत्रकारावर होणारे हल्ले हे लोकशाहीवर हल्ले आहेत त्यामुळे पत्रकरावील हल्ल्यांना पत्रकार संरक्षण कायदा अतरगत कार्य वाही करावी अन्यथा आम्ही आंदोलन उतरु
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*ग्राम हिवरा बु. येथे वित्तीय साक्षरता प्रशिकक्षण कार्यशाळा संपन्न!!* *वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर* *वाशिम*...