Home / विदर्भ / गडचिरोली / *वेदना प्रत्येकाच्या...

विदर्भ    |    गडचिरोली

*वेदना प्रत्येकाच्या मनात असतात परंतु कवि नोमेश यांच्या काव्यातील वेदना आभाड रुपी आहेत-डॉ. रविंद्र शोभणे*

*वेदना प्रत्येकाच्या मनात असतात परंतु कवि नोमेश यांच्या काव्यातील वेदना आभाड रुपी आहेत-डॉ. रविंद्र शोभणे*

*वेदना प्रत्येकाच्या मनात असतात परंतु कवि नोमेश यांच्या काव्यातील वेदना आभाड रुपी आहेत-डॉ. रविंद्र शोभणे*

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:-कवि नोमेंश नारायण यांच्या रक्त फुलाचे ताटवे या काव्यसंग्रहाचे प्रकाशन विदर्भ मराठी साहित्य संघ' मोरभवन नागपूर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. प्रदिप दाते हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणुन मराठी विभाग प्रमुख डॉ. शैलेश लेढे , कवि प्रा. विजय रेवतकर आदि लाभले होते. याप्रसंगी डॉ. शोभणे म्हणाले की, वेदना प्रत्येकाच्या मनात असतात परंतु नोमेश यांच्या काव्यसंग्रहातील वेदना आभाड रूपी असुन त्या शरीराला टोचून जाणाऱ्या आहेत. या आंबेडकरी कविनी आपले व समाजाचे सुख- दुखः आपल्या काव्यसंग्रहात माडले आहेत. तेही आदिवासी ' दुर्गम भागातील कवि ला राजहंस प्रकाशन पुणे यांनी उचलुन धरले आहे. भविष्यात नोमेश साहित्यीक म्हणुन नावारूपाला नक्कीच आल्या वाचून राहणार नाही. या काव्य संग्रहाची प्रस्तावणा साहित्यीक प्रा. प्रमोद मुनघाटे यांनी केली आहे. प्रा. डॉ नोमेश मेश्राम यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून मी कसा घडलो, डॉ. बाबासाहेबांमुळे मी आज इंग्रजीचा प्राध्यापक म्हणुन माझ्या काव्यसंग्रहात दिन , दलित , बहुजनांच्या हृदयातील वेदना रक्त फुलाचे ताटवे या काव्यसंग्रहातुन माडले आहे. याप्रसंगी डॉ. शैलेश लेंढे , प्रा. विजय रेवतकर यानीही काव्यसंग्रहाची मिमांशा करून इंग्रजीचा प्राध्यापक मराठीचे काव्यसंग्रह लिहुन एक प्रकारचा इतिहासच रचला असे सांगीतले. समाजामधे नविन दिशादर्शक करून दाखवायचे असेल तर मांडावे लागतात हेच कवि नोमेश यांनी मांडले. सर्व समावेशक हा काव्यसंग्रह नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही असेही डॉ. दाते यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ठाकरे यांनी केले तर आभार राजहंस प्रकाशन चे संचालक नरेश भाजीवाले यांनी केले. कार्यक्रमास कवि हदय चक्रधर , प्रा. शशी गेडाम  प्रा. ज्ञानेश्वर ठाकरे , प्रा. दिलीप घोडमोडे, प्रा. मुनिश्वर बोरकर , कवि अशोक शामकुळे ' टि. एम. खोब्रागडे , कमलनयन मेश्राम , विलास सेलोटे  आदि सहीत बहुसंख्य कवि  श्रोतेगण प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...