*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:- नुकतेच महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कॉग्रेस अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी मार्कंडादेव देवस्थानाला भेट दिली. मार्कंडा देवस्थान हे पुरातन हेमांडपंथी देवस्थान असून, वैनगंगेच्या काठावर उत्तर वाहिनीवर वसलेले असल्याने याचे फार मोठे धार्मिक महत्व आहे. त्यामुळे याला दक्षिणेची काशी म्हणुन ही ओळखले जाते. या मंदिरावर काही वर्षापुर्वी वीज पडल्यामुळे कळस भग्नावस्थेत होते. हे मंदिर पुरातन असल्यामुळे केंद्र व राज्याचा आर्कलॉजीकल सर्वे ऑफ इंडिया अंतर्गत पुरातन विभागाकडे येते. या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी पुरातन विभागाने मंदिराच्या कळसाखालील काही मुर्ती व दगड खाली उतरवून अंदाजे २०१५- १६ पासून दुरुस्तीचे काम सुरु आहे. या मंदिराचे ट्रस्टी यांनी स्थानिक आमदार, खासदार व केद्रींय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. पंरतू केंद्रात व राज्यात धार्मीक केंद्रीकरण करुन सत्ता हस्तगत करणारी विचार धारेची सत्ता असतांनी सुध्दा मागील ७-८ वर्षापासून बांधकाम अर्धवट असल्याने मंदिर भग्नावस्थेत आहे. यामुळे देवदर्शनाला येणा-या भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत.
यावर जालीम उपाय म्हणुन स्थानिक आमदार व खासदार मार्कंडादेव देवस्थानाला करणीची लागण झाल्याचे सांगून जलाभिषेक करण्यात आल्या. परंतू मार्कंडा देवस्थानाची करणी काही दुर झालेली नाही. लोकशाही मार्गाने घटनेच्या माध्यमातुन निवडून आल्यानंतर विधानसभा व संसदेतील विविध आयुधाचा वापर केंद्र व राज्य सरकारला वेठीस धरण्याऐवजी आमदार व खासदार हे लोकप्रतिनिधी करणी केल्याचे सांगून देवस्थानालाच वेढीस धरण्याचे काम या निष्क्रीय आमदार, खासदारांनी सुरु केलेली आहे. यापुर्वी महाराष्ट्रातील तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मार्कंडा देवस्थानाचा विकास करु प्रत्येक विधान परिषदेचा आमदार कडून निधी आणून मार्कंडा देवस्थानाचे अशा वलगणा केलेल्या होत्या. त्या वलगणेला आता जवळपास १० १२ वर्षे होवून गेलेला आहे. परंतु ना मार्कंडा देवस्थानाचा बांधकाम पुर्ण झाला न विकास झाला. या सगळया बाबीला स्थानिक आमदार, खासदाराचा निष्काळजीपणा मार्कंडा देवस्थानाला भोवली असल्याने मार्कंडा देवस्थानाची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे जनतेची धार्मीक भावना दुखावणा-या स्थानिक आमदार, खासदाराला जनतेने धडा शिकवावा. असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कॉग्रेस अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केलेले आहे.
यावेळी चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, अमर मोगरे, मर्कांडा ग्रामपंचायतच्या सरपंचा संगिता मोगरे, उपसरपंच उमाकांत जुनघरे, सदस्य लीलाधर मरसकोल्हे, सुषमा आत्राम, वर्षा सरपे, माजी सदस्य सुरेश बंडावार, मृत्युंजय गायकवाड, सरपंच सुधीर शिवणकर, उर्मिला आलाम, विकास रायसिडाम, राजु धोडरे आदींनी केली आहे.
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...