*पूरग्रस्त राजोली गावाचे पुनर्वसन करा*
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची मागणी
*राजोली पोटेगाव परिसरातील पूरग्रस्त भागाची केली पाहणी*
*तातडीनं आर्थिक मदत करून पुढील ३ महिन्यांचे अन्नधान्य , सिलेंडर मोफत पुरवठा करण्याची केली सूचना*
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-दिनांक २२ जुलै २०२३ गडचिरोली
संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये महापुराची परिस्थिती निर्माण झाली असून गडचिरोली तालुक्यातील राजोली पोटेगाव हे गाव पूर्णतः पाण्याखाली येऊन लोकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे तातडीने या गावाचे पुनर्वसन करून लोकांना तातडीनं आर्थिक मदत करावी व पुढील किमान ३ महिने पुरेल एवढा अन्नधान्य, सिलेंडर पुरवठा करून तातडीने सहायत्ता करावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली आहे.
यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोलीचे तहसीलदार महेंद्रजी गणवीर यांना सोबत घेवून गावातील पूर परिस्थितीची पाहणी केली व वस्तुस्थितीशी त्यांना अवगत केले. गावाला तातडीने आर्थिक मदत करून अन्नधान्याचा पुरवठा व सिलेंडर मोफत पुरवठा तातडीने करण्याबाबत असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. सदर प्रश्न आपण विधानसभेत उचलणार असून गावच्या लोकांना सर्वतोपरी मदत मिळेल यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.