Home / विदर्भ / वाशिम / *"लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट...

विदर्भ    |    वाशिम

*"लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट कडून मोफत शैक्षणिक साहित्य वाटप."!!*

*

लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट कडून  मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

 

*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*

 

*कारंजा (लाड* ):लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट मागील  चौदा वर्षांपासून अनाथ , एकल पालकतत्व ,आदिवासी , आणि दुर्लक्षित  दुर्गम भागातील गरीब मुला सोबत वाशिम जिल्ह्यात मानोरा, शेलुबाजार , पारडी टकमोर, शेंदूरजना , धाकली आणि महान  या  ठिकाणी 420 मुलासोबत काम करत आहे. प्रत्येक मुलगा शाळेत गेला पाहिजे आणि तो शाळेत टिकला पाहिजे , त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा या साठी यावर्षी 420 विद्यार्थ्याची निवड करून त्यांच्या सोबत संस्था काम करत आहे. याचाच एक भाग म्हणून  यावर्षी  भायजी महाराज विध्यालय धाकली येथे वर्ग 8 ते 10 च्या 65 मुलांना 13 जुलै रोजी शैक्षणिक साहित्य वाटप  करण्यात आले आहे . प्रमुख पाहुणे  अनीलभाऊ राठोड, सेवादास शिक्षण संस्थेचे  उपाध्यक्ष तसेच सतीश बुधोट, शाळा समिती सदस्य, आणि मुख्याध्यापक   एम.  आर. ठाकरे सर. प्रा.डी . बी.चव्हाण, प्रा.बुधोट, के डी चव्हाण, संदीप वानखेडे सर  व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचांरी उपस्थित होते. वरिष्ठ अधिकारी रामहरी इरकर यांनी  सस्थेच्या कामाची माहिती दिली. व शिक्षणाचे महत्व पटवून दिले.  मुख्याध्यपक  ठाकरे सर यांनी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट च्या कार्याचे कौतुक केले. प्रा. चव्हाण सर व वानखडे सर यांनी मनोगत व्यक्त केले. विध्यार्थी व पालक यांनी डॉ. विली मॅडम यांचे धन्यवाद मानले. या साठी मनेष मनवर, विजय खडसे, पवन घुगे, राधेश्याम घुगे, साखरे सर, भगत सर, चव्हाण सर, सोनोने सर, देशमुख सर सुरज राठोड या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अवंती देशमुख  तर  आभारप्रदर्शन  कु. अंकिता  बढे  हिने  केले.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...