*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
७ ऑगस्टला तिरुपती येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आठवे महाअधिवेशन
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या तिरुपती येथे ७ ऑगस्टला होणाऱ्या आठव्या अधिवेशनात ओबीसी समाज बांधव व भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केले. तिरुपती येथील अधिवेशनाच्या तयारी संदर्भात धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर येथे रविवारी ९ जुलै रोजी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला डॉ. तायवाडे यांच्यासह राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वय डॉ. अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजूरकर, उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, कोषाध्यक्ष गुनेश्वर आरेकर, महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, महिला शहर अध्यक्ष वृंदा ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. डॉ. तायवाडे यांनी अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या विविध विषयांची माहिती यावेळी दिली. ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना, केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, क्रिमिलियरची अट रद्द करावी, अट रद्द होईपर्यंत क्रिमिलियरची मर्यादा वीस लाख रुपये करावी, मंडल व स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्या, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार बहाल करावा, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे, ओबीसी विजा भज व विशेष मागास प्रवर्ग समाजातील विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहे सुरू करावेत. स्वाधार व वस्तीगृहनिर्वाह भत्ता योजना लागू करावी, ओबीसी प्रवर्गाचा ॲट्रॉसिटी कायद्यात समावेश करावा यासह अन्यही मागण्या मंजूर करून घेण्यासाठी तिरुपती येथील अधिवेशनात सहभागी व्हावे असे आव्हान डॉ. तायवाडे यांनी केले, बैठकीला राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाचे अध्यक्ष प्रकाश साबळे, महिला महासंघाच्या प्रदेश अध्यक्ष कल्पना मानकर, विदर्भ अध्यक्ष विजया धोटे, शकील पटेल, ऋषभ राऊत, राजू चौधरी, पराग वानखेडे, शुभम वाघमारे, रुचिका डफ, विनोद हजारे यांचे सह महासंघाचे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी, महाराष्ट्र कार्यकारणी विदर्भ कार्यकारणी, सर्व जिल्हाध्यक्ष व बहुसंख्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. संचालन सहसचिव शरद वानखेडे यांनी केले तर आभार परमेश्वर राऊत यांनी मानले.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...