*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-शासन आपल्या दारी या योजनेच्या कार्यक्रमातुन जनतेची कामे एका छताखाली होत आहेत. सदर योजने अंतर्गत गडचिरोली जिल्हयातील लाभार्थ्यांनी रेकार्ड ब्रेक केलेला आहे. सरकारच्या मदतिने विधायक कामे होत आहेत. लोकांनी चकरा मारू नये त्यांची कामे झाली पाहीजेत यासाठी राज्य शासनच आपल्या घरापर्यत येत आहे. या जिल्ह्यात ७लाख लार्भात्याची नोंद झाली आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब. हे मोडायचे आहे. राज्य शासन दिव्यांगांना सहकार्य करीत आहे. १६ हजार झाडे वनविभागानी लावायचे आहेत. महिलांच्या सक्षमीकरणाचा निर्णय होत आहे. एस.टी तिकीट अर्धी केली आहे. वयोवृद्धांना प्रवास पुर्ण फुकट होणार आहे. बचत गटांना आणखी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकार तुम्हाला सहकार्य करीत आहे. आपणही सरकाराला सहकार्य करावयाचे आहे. सुरजागड लोह प्रकल्पामुळे लाखो बेरोजगारांगा नोकऱ्या मिळणार आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे नोकरी मागण्या पेक्षा नोकरी देणाऱ्यांचे हात पुढे आले पाहीजे. सोबतीला अजीत दादा आहेत आता तिघांचेही मजबुत हात आहेत आता गडचिरोली जिल्हयाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. अश्या प्रकारचे मार्गदर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमा प्रंसगी केले. एमआयडीसी कॉम्पेक्स , गडचिरोली येथे शासन आपल्या दारी हा राज्य शासनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ' उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , मंत्री धर्मराव बाबा आत्राम. खासदार अशोक नेते ' आमदार डॉ. देवराव होळी' आमदार कृष्णा गजबे , माजी मंत्री शोभाताई फडणविस ' पद्मश्री परशुराम खुणे ' जिल्हाधिकारी संजय मिणा , CE O कुमार आर्शीवाद यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रंसगी मंत्री धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की ' या आदिवासी जिल्हयात शासन आपाल्या दारी आलेले आहे. ७ लाख लार्भात्यांना या योजनचा फायदा झालेला आहे. या जिल्ह्यात उद्योग्य आणण्याचे काम निघांनीही केलेले आहे. कर्मचारी कमी आहेत मुख्य मंत्र्यांनी कर्मचारी वाढवावेत. कोनसरी लोह प्रकल्पात बेरोजगारांना विशेषता स्थानिकांना प्राध्यान्य दिले पाहीजे. सरकारवर लोकांचा विश्वास आहे. आम्ही तुमच्या पाठीसी आहोत . उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी सांगीतले की , सर्व सामान्याचे प्रश्न सुटावेत यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आम्हाला कामाला लावले आहे. विमान स्थळासाठी जागा उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे विमान स्थळ उभारण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. राष्रवादीने राज्यांच्या विकासाठी निर्णय घेतला आहे. करोडो रुपयाची कामे दिली जात आहेत. तेव्हा कामेही दर्जेदार झाली पाहीजेत असेही पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस याप्रंसगी मार्गदर्शन करताना म्हणाले की, शासन आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत आम्ही आज एकत्र आलोत. गडचिरोली जिल्ह्यातील लार्भात्यांनी रेकार्ड मोडला आहे. याच कारणच असे आहे की शासन आपल्या पाठीसी आहे. दादाडोरा खिडकीच्या माध्यमातून पोलीसांनी चांगली कामगिरी बजावली आहे. आमचे त्रिशूल हे विकासाचे त्रिशुल आहे. आता पुन्हा गडचिरोली जिल्हयाचा विकास जोमाने झाल्याशिवाय राहणार नाही. कोनसरी प्रकल्य आता आम्ही बंद पडू देणार नाही. गडचिरोलीत विमान स्थळ झाल्याशिवाय राहणार नाही. रेल्वे मार्ग सुद्धा मार्गी लागणार आहे. विकास होणारच आहे . २४ तास विज पुरवठा करू , ओबिसी घटकासाठी घरकुलाची योजना शासन योजत आहे. कार्यक्रमात अनेक योजनेच्या लार्भात्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन प्रा. आरेकर यांनी तर आभार CEO कुमार आर्शीवाद यांनी मानले. कार्यक्रमास तोबा गर्दी होती.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...