*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-भारत सरकारचे जलशक्ती मंत्रालय अंतर्गत, पेयजल व स्वच्छता विभाग नवी दिल्ली, राज्य पाणीपुरवठा मिशन कक्ष बेलापूर, नवी मुंबई. जिल्हा परिषद गडचिरोली व अश्वमेघ ग्रामीण पाणलोट क्षेत्र विकास व शैक्षणिक संस्था फत्तेपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जलजीवन मिशनचे दोन दिवसीय प्रशिक्षण गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षणामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सरपंच (पाणीपुरवठा अध्यक्ष) आशा सेविका, अंगणवाडी सेविका, प्रेरिका, ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्य मंडळींना बोलविण्यात आले होते.
यामध्ये प्रशिक्षणार्थींना प्रत्येक घरी नळ जोडणी, प्रतिव्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी, हर घर नल, हर घर जल, त्याकरिता गावात तेवढे पाणी उपलब्ध आहेत का? नसेल तर काय उपाययोजना करायची, उंच भागात जर पाणी पोहोचत नसेल तर काय करावे, सर्वांनी आपल्या घरच्या नळाला तोट्या लावायच्या जेणेकरून गावातील प्रत्येक घरी पाणी पोहोचेल.
सर्व गावकऱ्यांनी घर टॅक्स व पाणीपट्टी कर भरावा जेणेकरून जी देखभाल दुरुस्ती करायची असते ती केल्या जाईल. भविष्यामध्ये लोकसंख्या वाढणार आहे, पाण्याची गरज वाढणार आहे त्याकरिता आत्तापासूनच आपल्याला त्याची व्यवस्था लावून ठेवायची आहे.
आता पावसाळा सुरू होत आहे गावकऱ्यांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा झाला तर गावात रोगराई पसरेल त्याकरिता गावात स्वच्छता राखायला पाहिजे जेणेकरून आजाराचा फैलाव होणार नाही.
ज्याप्रमाणे प्रत्येक घरी नळ द्यायचे त्याचप्रमाणे शाळा अंगणवाडी यांना सुद्धा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करायचा आहे.
गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत जरी नळ जोडणी दिली असली तरी त्याची अंमलबजावणी सनियंत्रण देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी गावकऱ्यांची गावाची आहे.
जलजीवन मिशनमध्ये पाच ज वर काम करायचे आहे. सोबतच पर्यावरणाचा होणारा ह्रास यालाही विचारात घ्यायचे आहे.इत्यादी भरपूर विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी जिल्ह्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री कुत्तिरकर सर, कुरखेडा चे पाणी व स्वच्छता विभाग देविकर सर ,सर्व तालुक्याचे गटविकास अधिकारी, अश्वमेघ ग्रामीण पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष श्री पांडे सर , प्रशिक्षण समन्वयक श्री लीलाधर पटले सर, श्री उमेश गाडबेल सर, वैद्य सर, , सर्व प्रशिक्षक, सर्व तालुक्याचे बीआरसी यांनी मेहनत घेतली.
या प्रशिक्षणाच्या ग्रामपंचायत तळेगाव त.कुरखेडा येथील प्रशिक्षण स्थळी प्रशिक्षक सविता झाडे, अश्विनी वडेट्टीवार, उमेश तिरमारे यांनी प्रशिक्षणार्थींना सखोल मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण कार्यक्रमाला तळेगाव च्या सरपंच आशा नैताम , शशिकला कुमरे,कन्नाके सर ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत तळेगाव, तालुका समन्वयक कोटांगले सर,शिपाई दिलवर जोगे उपस्थित होते.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...