Home / विदर्भ / गडचिरोली / *चौकशी समितीच्या अहवालानुसार...

विदर्भ    |    गडचिरोली

*चौकशी समितीच्या अहवालानुसार भामरागड, अहेरी व मूलचेरा तालुक्यातील मनरेगा अंतर्गत कामांमध्ये दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ बरखास्त करा* *आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना योगाजी कुडवे यांचे निवेदन*

*चौकशी समितीच्या अहवालानुसार  भामरागड, अहेरी व मूलचेरा तालुक्यातील मनरेगा अंतर्गत कामांमध्ये दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ बरखास्त करा*

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना योगाजी कुडवे यांचे निवेदन*

*प्रशासनाने कारवाई न केल्यास ११ जुलै पासून जिल्हा परिषद समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा*

*अहवालातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार आमदार महोदयांचे कुडवे यांना आश्वासन*

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

गडचिरोली:-२६ जून गडचिरोली

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, अहेरी व मूलचेरा या तीन तालुक्यातील करोडो रुपयांचे बोगस काम व काम न करता पैशाची उचल केल्यासंदर्भातील तक्रारीच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी गठित केलेल्या  समितीच्या अहवालामध्ये या तीन पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी आढळलेले आहेत. त्यामुळे या दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे कडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

दिलेल्या निवेदनानुसार भामरागड पंचायत समितीतील गटविकास अधिकारी ,विस्तार अधिकारी, शाखा अभियंता ,नरेगा तांत्रिक अधिकारी (टि पी ओ)  तसेच बोटनफुंडी, ईरूपडूम्मे,  मडवेली, मन्नेराजाराम ,येचली ,पल्ली, या ६ ग्रामपंचायतीचे सचिव, असे एकूण १० अधिकारी व कर्मचारी दोषी आढळलेले आहेत

अहेरी पंचायत समितीतील गटविकास अधिकारी ,विस्तार अधिकारी, शाखा अभियंता  ,नरेगा तांत्रिक अधिकारी (टि पी ओ) तसेच मनोहर ग्रामपंचायतीचे सचिव असे एकूण ५ अधिकारी व कर्मचारी जोशी आढळलेले आहेत मुलचेरा पंचायत समितीतील गटविकास अधिकारी ,विस्तार अधिकारी, शाखा अभियंता  ,नरेगा तांत्रिक अधिकारी (टि पी ओ) विवेकानंदपूर सुंदरनगर शांती ग्राम व येल्ला ग्रामपंचायतीचे सचिव  असे एकूण ८ अधिकारी व कर्मचारी दोषी आढळलेले आहेत.

त्यामुळे या सर्व दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे केली असून या संदर्भात प्रशासनाने कारवाई न केल्यास जिल्हा परिषद गडचिरोली च्या समोर ११ जुलैपासून ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या