Home / विदर्भ / अकोला / *सर्वोउपचार रुग्णालयातील...

विदर्भ    |    अकोला

*सर्वोउपचार रुग्णालयातील अपघात कक्षातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा*

*सर्वोउपचार रुग्णालयातील अपघात कक्षातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा*

*सर्वोउपचार रुग्णालयातील अपघात कक्षातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा*

 

✍️उमेश इंगळे

   अकोला

 

अकोला: -  दि ०४/०६/२०२३ रोजी रात्री १:४५ वाजता चंद्रप्रकाश वानखडे रा चांदुर खडकी जी अकोला याचा कामावरून घरी जातांना गाडी घसरुन (स्लीप) अपघात झाला.उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी व त्यांच्या भाऊ व मित्र मंडळी नी त्याला तात्काळ सर्वोपचार रुग्णालयात तपासणी व उपचारासाठी घेऊन गेले असता, अपघात कक्षातील डॉक्टर यांनी वरच्या वर तपासणी करून सिटीस्कॅन करून या असे सांगितले . रुग्णांना घेऊन त्यांचे नातेवाईक ओझोन हॉस्पिटल मधुन सिटीस्कॅन करून आणले असता ,सर्वोपचार रुग्णालयातील ८ डॉक्टर पैकी काही डॉक्टर झोपलेले होते व बाकी गप्पा करण्यात मग्न होते.त्यांना उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी हटकले असता त्यांनी रुग्णांची तपासणी केली व नागपुर ला रेफेर करण्यासाठी सांगितले.पंरतु त्या रुग्णाला येवढा मार लागल्या नंतर ही अपघात कक्षातील डॉक्टरांनी साधी मलमपट्टी (ड्रेसिंग) केली नाही.त्यांना सांगितल्यानंतर ही त्यांनी त्यांची काही गरज नाही असे सांगून मोकळे झाले परंतु रुग्णांला झालेल्या जखमेतून रक्त येत होते.उमेश इंगळे यांनी CMO  ला सांगितले तरी पण CMO व इतर डॉक्टर आपल्या खुर्चीवरून उठायला तयार नव्हते. अपघात कक्षातील डॉक्टर रुग्णालयात झोपा काढायला येतात का ? असा प्रश्न उमेश इंगळे यांनी केला आहे.अपघात कक्षातील डॉक्टर आपल्याशी अतिशय उद्धटपणे बोलले. अश्या बेजबाबदार व रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या  दि.०४/०६/२०२३ रोजी अपघात कक्षात कार्यरत डॉक्टरला निलंबित करा अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य तिव्र आंदोलन छेडेल यांची नोंद घ्यावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा मॅडम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये यांना ईमेल व आपले सरकार पोर्टल द्वारे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...