*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
या नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन व लोकार्पण येत्या २८ तारखेस
गडचिरोली:- झाडीपट्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांचे हस्ते प्रा. विलास निंबोरकर यांचे घरी, परिश्रम निवास, आरमोरी रोड, गडचिरोली येथे संपन्न होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्य समिक्षक प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर, राहणार असून प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम हे पुस्तकावर भाष्य करणार आहेत. तर प्रा. डॉ. राजकुमार मुसने हे नाट्य समीक्षण करणार आहेत.
विशेष अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, प्रा. डॉ. एस.एन.पठाण, प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे, प्रा. डॉ. धनराज खानोरकर, प्रा. सदानंद बोरकर (नाटककार) , प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, प्रा. शेखर डोंगरे (नाट्य कलावंत), प्रा. श्रीकांत कुतरमारे, अनिरुध्द वनकर (नाटककार व दिग्दर्शक), प्रा. डॉ. नरेश मडावी, प्रा. डॉ. माधव कांडणगीरे, प्रा. योगीराज नगराळे, प्रा. डॉ. सविता सादमवार व प्रसिद्ध आदिवासी साहित्यिका कुसूमताई आलाम उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी झाडीपट्टीतील संगीतकार विठ्ठल खानोरकर हे क्रांतीवीर बाबुराव शेडमाके या नाटकातील नाट्यगिते सादर करणार आहेत.
या निमित्ताने झाडीपट्टीतील निवडक कविंचे कविसंमेलनही घेण्यात येणार असून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील कवी सहभागी झालेले आहेत. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त कवी, साहित्यिक व रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नाट्यश्री चे दादा सुंदरकर, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे, योगेश गोहणे, प्रा. अरुण बुरे व सौ. कुंदा बल्हारपूरे यांनी केले आहे.
चुडाराम बल्हारपुरे हे झाडीपट्टीतील राज्य पुरस्कार प्राप्त नाटककार आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार प्राप्त झालेले आहे. आजपर्यंत त्यांची विविध ११ पुस्तके प्रकाशित झाली असून हे त्यांचे बारावे पुस्तक आहे. विविध स्तरावरील अनेक पुरस्काराने ते सन्मानीत आहेत. महामृत्युंजय मार्कंडेश्वर, बहूढंगी समाधीवाले बाबा, व धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा ही त्यांची गाजलेली नाटके आहेत.
नुकत्याच झालेल्या कंथेवाडी साहित्य संमेलनात त्यांच्या " गोंडवानाचा महायोध्दा-क्रांतिवीर बाबुराव शेडमाके" या नाटकास "राज्य स्तरीय प्रेरणा साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...