*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-दिनांक १४/५/२०२३
गडचिरोली जिल्ह्यासह परिसरातील सर्वसामान्य रुग्णांना परवडेल अशा योग्य शुल्कामध्ये उत्तम रुग्णालयीन सेवा मिळावी या सेवा भावाच्या हेतूने डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल व रिसर्च सेंटर मेंढा येथे रोल संस्थेच्या माध्यमातून सुरु करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख श्री सुनीलजी देशपांडे यांनी मेंढा बोदली नियोजित डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी मार्गदर्शन करताना केले.
यावेळी मंचावर मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराजजी अहिर, संघाचे क्षेत्राचे पदाधिकारी दीपकजी तामशेट्टीवार, मा. पद्मेशजी गुप्ता, नागपूर एन. सी. आय. कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. शैलेशजी जोगळेकर, खासदार अशोकजी नेते ,विभाग संघचालक मा.जयंतरावजी खरवडे, मेंढा येथील सरपंच वैशालीताई चचाने उपस्थित होते.या भूमिपूजनाला गडचिरोली चे आमदार डॉक्टर देवरावजी होळी, आरमोरीचे आमदार कृष्णाजी गजबे ,माजी मंत्री अहेरी इस्टेटचे राजे मा. अंबरीशराव आत्राम, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतजी बोकारेजी , रोल संस्थेचे अध्यक्ष धीरजजी पटेल, संघाचे जिल्हा संघचालक घिसुलाल जी काबरा , यशजी गुप्ता,रोलचे सचिव गोविंदजी सारडा, डॉ. सुरेशजी डंबोळे ,ॲड. प्रीतीताई डंबोळे ,नागपूरचे वास्तू विशारद गौरवजी भुसारी,सौ भुसारीताई, डॉ. मिलिंदजी नरोटे, हेमंतजी राठी, डॉक्टर हेडगेवार सेवा समितीचे सचिव ॲड. आशिषजी धर्मपुरिवार, डॉक्टर हेडगेवार सेवा समितीचे पूर्व अध्यक्ष वसंतरावजी थोटे , डॉ. आशिषजी बाटवे, डॉ प्रशांतजी चलाख, डॉ किशोर वैद्य, यांचे सह मान्यवर प्रामुख्यानं उपस्थित होते.गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य गरीब परिवारातील रुग्णाला पैशाअभावी चंद्रपूर ,नागपूर , मुंबई सारख्या मोठ्या शहरातील रुग्णालयांमध्ये जाण्यास अडचण निर्माण होते. परिणामी अनेक रुग्णांचा नाहक जीवही जातो. आपल्या या नक्षलग्रस्त आदिवासी जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या उत्तम सोयी सुविधा त्यांना परवडेल अशा शुल्कात मिळावी या सेवाभावनेच्या माध्यमातून डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल व रिसर्च सेंटर सुरू करण्याचा विचार होता . त्या विचाराचा शुभारंभ या भूमिपूजनाच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन मा.सुनीलजी देशपांडे यांनी या भूमिपूजनाच्या प्रसंगी केले
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...