Home / विदर्भ / गडचिरोली / *१५ मे रोजी मार्कंडादेव...

विदर्भ    |    गडचिरोली

*१५ मे रोजी मार्कंडादेव येथे होणाऱ्या भव्य जलाभिषेकाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने या* *आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांचे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाविकांना आवाहन*

*१५ मे रोजी मार्कंडादेव येथे होणाऱ्या भव्य जलाभिषेकाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने या*    *आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांचे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाविकांना आवाहन*

*१५ मे रोजी मार्कंडादेव येथे होणाऱ्या भव्य जलाभिषेकाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने या*

आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांचे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाविकांना आवाहन

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

गडचिरोली:-मार्कंडा देवस्थान येथे मंदिराच्या पूर्णत्वासाठी भव्य जलाभिषेकाच्या कार्यक्रमाचे आयोजन

चामोर्शी ते मार्कंडा कलश यात्रा, दिंड्या, भजन गावागावातून  भक्त भाविक येणार

दिनांक १३मे गडचिरोलीविदर्भाची काशी असणाऱ्या मार्कंडा देवस्थानाचे  २०१५ पासून दुरुस्ती चे हाती घेतलेले काम अजून पर्यंत पूर्ण न झाल्याने हिंदू संस्कृतीनुसार देवी देवतांना या मंदिराच्या पूर्णत्वासाठी जागृत करण्याची धार्मिक विधी मार्कंडेश्वर देवस्थान समिती व परिसरातील  धर्माचार्य भक्त भाविक यांनी नियोजित केले असून ५ मे २०२३ पासून १५ मे २०२३ पर्यंत भगवान महादेवाचे जागृती अनुष्ठान सुरू आहे. या धार्मिक विधीचा समारोप १५ मे रोजी जे भव्य जलाभिषेकाच्या विधीने होणार असून या जलाभिषेकाला मार्कंडेश्वरावर प्रेम करणारे भक्त भाविक  यांनी मोठ्या संख्येने  सहभागी व्हावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून  भाविकांना केले आहे.

या पत्रकार परिषदेला जिल्ह्याचे महामंत्री प्रमोदजी पिंपरे,शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर जी काटवे ,नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल भाऊ कुनघाडकर ,पंचायत समितीचे उपसभापती विलास जी दशमुखे, जिल्ह्याचे युवा मोर्चा महामंत्री मधुकरराव भांडेकर, तालुका  महामंत्री हेमंत बोरकुटे,  शहराचे महामंत्री माजी नगरसेवक केशव निंबोड, विनोद देवोजवार, राजूभाऊ शेरकी, देवाजी लाटकर, देवानंद चलाख, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.मार्कंडा देवस्थानाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण व्हावे याकरिता मागील ७-८ वर्षांपासून शासन, प्रशासन,  आमदार खासदार ,मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री सर्व स्तरांवर पाठपुरावा  झालेला आहे. मात्र त्यात यश आलेले नाही. मंदिराच्या कामाची गती संत असून ते लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी सुरू असलेले प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. त्यामुळे हिंदू चालीरीती, परंपरा  ,संस्कृतीनुसार भगवान महादेवाचे जागृती अनुष्ठान करणे व जलाभिषेक करावे असा मार्कंडेश्वर देवस्थान समितीच्या वतीने व परिसरातील धर्माचार्य ,भक्त भाविक यांच्या वतीने ठरविण्यात आले. त्यानुसार दिनांक ५ मे पासून जागृती अनुष्ठान पू संत श्री मुरलीधर महाराज यांच्या हस्ते २४ तास अहोरात्र सुरू असून त्याचा समारोप दिनांक १५ मे रोजी जलाभिषेकाच्या भव्य कार्यक्रमाने होणार आहे  तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी या माध्यमातून केले आहे.

ताज्या बातम्या

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* 23 December, 2024

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन*

*परभणी प्रकरण व अमित शहा यांच्या वक्तवाचा निषेध करून एटापल्लीवासीयांनी दिले निवेदन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-एटापली...

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. 23 December, 2024

निवडणूक काळात निलंबित केलेल्या सर्व पदाधिका-यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घ्या, काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी.

वणी :- विधानसभा निवडणुकीच्या काळात वणी विधानसभेतील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या ८ पदाधिका-यांना पुन्हा पक्षात...

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* 23 December, 2024

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*

*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

गडचिरोलीतील बातम्या