*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न*
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :- चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपली आहे. सदर निवडणूक हि चुरसीची निवडणूक ठरणार आहे. कारण या निवडणुकीत भाजप ' कांग्रेस , शिवसेना ' राष्ट्रवादी आदी पक्ष एकत्रपणे निवडणुकीत फिरताना व तसा प्रचार ही करीत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे हि निवडणूक माजी सभापती अतुल गण्यारपवार यांच्यासाठी जड जाणार असल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे. गेल्या २०-२५ वर्ष कृषी उत्पन्न बाजार समिती एकसत्ता अतूल गण्यारपवार यांच्या हाती होती. त्यावेळेस विरोधकाची संख्या कमी होती. मध्यंतरी गण्यारपवार यांचेवर आरोप _ प्रत्यारोप होत होते. त्यामुळे आता सर्व राजकिय गट एकत्र येवून सत्ता काबिज करण्याचा चंग बांधल्याचे कळते. सदर निवडणूकीच्या प्रचार दरम्यान अतुल गण्यारपवार यांना रात्रौ आष्टीत पोलिसांनी ताब्यात घेतले होते. व चामोर्शीचे पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक खांडवे यांनी अतुलला बेदम मारहान केली. ते सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे काही दिवश भरती होते. प्रकृती सुधारत नाही या कारणामुळे संध्या ते नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अतुल गण्यारपवार यांना पोलिसांनी केलेल्या मारहान प्रकरणात काही राजकीय पक्ष व त्यांच्या समाज संघटनांनी ठाणेदार खांडवे यांना निलबित करा अश्या प्रकारचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक निलोप्पन यांना दिले परंतु ठाणेदाराची बदली करण्यात विरोधकांना यश आले नाही. सदर प्रकरणाची चौकशी सुरू आहे. याच दरम्यान पोलिस बॉईज अशोशिएशन गडचिरोली यांनी म्हटले आहे की गणारपवारच दोषी आहेत. पोलिसांना शिविगाळ व चुकीचे आरोप करणाऱ्या गण्यारपवारावरच कारवाई करा अश्या मागणीचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक गडचिरोली यांना देण्यात आलेले आहे. यात सत्यता नाकारता येत नाही. नाहीतर दोन्ही बाजुने निवेदन देणे हे क्वचितच घडते. इकडे कृषी उत्पन्न बाजार समितीची चुरसीची लढाई तर तिकडे गण्यारपवार रुग्णालयात भरती त्यामुळे अतुल गण्यारपवार यांना साहनभुती मिळेल तर गण्यारपवार गट निवडणुकीत बाजी मारु शकतो पण तिकडे राजकीय सर्वच गट एकत्रितपणे शेवटपर्यत एकोप्याने राहीले तर गण्यारपवार यांना फार मोठा हादरा बसु शकतो. असे राजकीय जानकाराचे मत आहे.
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
*समता सैनिक दलाचे येरंडी येथे शाखा उदघाटन संपन्न* ✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-कुरखेडा - कुरखेडा तालुक्यातील...
*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....