Home / विदर्भ / गडचिरोली / राष्ट्रीय गुरु रविदास...

विदर्भ    |    गडचिरोली

राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा च्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन

राष्ट्रीय  गुरु  रविदास क्रांती मोर्चा च्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन

राष्ट्रीय  गुरु  रविदास क्रांती मोर्चा च्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:- संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील चिकलठाणा येथील चर्मकार भगिनी नीता संतोष जोंधळे ३२ वर्षे या महिलेवर तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार करून तिचा खून केला. सदर गरीब महिला २ एप्रिलला चर्चमधून साफसफाई करून एकटीच घरी येत असताना त्या नराधमांनी रस्त्यात गाठले. तिच्यावर सामूहिक अत्याचार करून तोंडात कापड टाकून बेदम मारहाण केली व त्यानंतर हत्या करून फेकून दिले. ते नराधम गुंडगिरी प्रवृत्तीचे असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तक्रार करून गुन्हेगारांना अजूनपर्यंत पकडण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना पकडून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पीडित परिवाराला तात्काळ २५ लाख रुपये मदत द्यावे. तिच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे . पीडित परिवारातील मुला मुलींच्या शिक्षणाची सर्वस्वी जबाबदारी शासनाने घ्यावी .खटला जलद गतीने चालावावे . आरोपीवर मोक्का पास्को यासारखे गुन्हे दाखल करावे . अशा विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री व राज्यपाल यांना राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले . जर पीडित महिलेच्या कुटुंबाला योग्य न्याय मिळाला नाही तर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.हे निवेदन महाराष्ट्रातील ३६ जिल्हे व ३६७ तालुक्यात देण्यात आले.

      निवेदन देते वेळेस जनार्दन ताकसांडे, भोजराज कानेकर, प्रमोद राऊत ,कृष्णा जुनघरे ,नथू अंडेलकर , वामनराव मशाखेत्री , सुनंदा लांजेवार , प्रभाकर काटवे , मधुकर चौधरी ,अजय भंडारे ,कालिदास बारसागडे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* 23 December, 2024

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

गडचिरोलीतील बातम्या

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार*

*वनिता बांबोळे यांनी शिवणी येथील बुद्ध विहारात दान केलेल्या बुद्धमुर्तीचे प्रतिष्ठापणा होणार* ✍️ मुनिश्वर बोरकर ...

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...