*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
अमरावती:-विश्ववंदनीय महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०२३ ला सायंकाळी ५ वाजता स्थळ वाकपूर (दादापूर ) तहसील नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक अशोककुमार उमरे यांचे रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यानाचे तसेच बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले.
दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडियाचे प्रचारक हंसराज सोनोने, अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत प्रमुख वक्ता म्हणून रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक अशोककुमार उमरे आपल्या भाषणात म्हणाले की, बाबासाहेबांनी दिलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुभावाच्या रक्षणासाठी लोकशाहीचा सर्वोच्च सिद्धांत बहुमत आणि अल्पमत यांचा सन्मान करतो आणि संविधानाच्या मापदंडाच्या अंमलबजावणी सतत संघर्षरत हेच बाबासाहेबाचे सच्चे निष्ठावान अनुयायी कार्यकर्ते आहेत. असा कार्यकर्ता बाबासाहेबांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समता सैनिक दल आणि दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया या अधिकृत पक्ष संघटना सोडूच शकत नाहीत. तसेच या पक्ष संघटनेतील चुकीच्या नेत्यांना संविधानानुसार वठणीवर आणण्यासाठी बाबासाहेबांचा निष्ठावान, स्वाभिमानी कार्यकर्ता सतत कार्यरत राहून पक्ष संविधानेतील नेत्यांपेक्षा संविधानाला सर्वोच्च देत आपला नेता व पदाधिकारी दर चार वर्षांकरिता निर्वाचित करीत प्रत्यक्ष लोकशाही रूजविण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत राहणे हीच खरी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आदरांजली व विचारांची जयंती आहे. असे प्रतिपादन अशोककुमार उमरे यांनी केले.
व्याख्यानाच्या कार्यक्रमानंतर बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक दिला तसेच अन्य सहभागी सर्व स्पर्धकांना मान. हंसराज सोनोने, अमरावती, अशोककुमार उमरे गडचांदूर चंद्रपूर ( बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संविधान आणि बाबासाहेबांनी भारतीय जनतेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या अधिकृत पक्ष संघटनेत सामील होण्यासाठी आवाहन केलेले खुले पत्र ) व रामेश्वर गडलिंग यांनी चळवळीचे प्रबोधनकारी पुस्तके देऊन स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला.
बक्षीस वितरण _
१. आरोशी ईश्वर गडलिंग
२. रितिका धनराज गडलिंग
३. किंजल किरण ढवळे
४. अनुष्का धनराज गडलिंग
५. नंदिनी ईश्वर गडलिंग
६. अक्षरा रामेश्वर गडलिंग
७. प्रतिक राजू सोनोने
८. अभिनव योगीराज गडलिंग
सुत्रसंचलन व प्रास्ताविक समता सैनिक दलाचे सैनिक रामेश्वर गडलिंग यांनी आणि आभारप्रदर्शन सारिकाताई अनिलराव सोनोने यांनी केले.
सकाळच्या सत्रात बाबासाहेबांचा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले व तदनंतर समता सैनिक दलाच्या महिला विंगच्या माध्यमातून ध्वजसंचालन व गांवकरी मंडळींच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली. तसेच सहभोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमांस लक्ष्मण ढवळे, अवधुत मोहड, रामकृष्ण मोहड, रविंद्र गोंडाने, अनिल सोनोने, आकाश गवई, रामेश्वर गडलिंग, राजु सोनोने, ललिताबाई मोहोड, रिंकूताई गडलिंग, सविताताई मोहोड, सुजाताताई गडलिंग, शुभांगी ढवळे, कांताबाई ढवळे, प्रेमिला सोनोने, सारिका सोनोने, मयुरी गडलिंग, सुर्यकांता गवई, प्रिया मोहोड, शुभांगी गडलिंग, रूपाली राजुभाऊ सोनोने, बेबीबाई ढवळे, श्रृती दिपक गडलिंग, ऋतुजा अतूल कराळे, नंदिनी ईश्वर गडलिंग, अनुष्का धनराज गडलिंग, अक्षरा रामेश्वर गडलिंग, आरूषी ईश्वर गडलिंग, परी अतुल काराळे, किंजल किरण ढवळे, ऋतिका धनराज गडलिंग, धनराज गडलिंग इत्यादींनी उपयुक्त योगदान देऊन कार्यक्रम योग्य रीतीने घडवून आणला.
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध* *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी* मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-देशाचे...
वणी:- लोहार समाज संघटना वणीच्या वतीने भव्य राज्यस्तरीय परिचय मेळावा २१ व २२ डिसेंबर रोजी तिरुपती मंगल कार्यालय येथे...
*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली नांदगाव (खंडेश्वर):-16...
*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला* मिळाला तात्काळ न्याय ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली अमरावती:-चांदुर...
भारतीय वार्ता :अमरावती आजच्या आधुनिक युगात सर्वत्र धावपळ, स्वार्थ आणि नफेखोरी दिसून येते, कोणाकडेही इतरांसाठी...