*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :अमरावती
आजच्या आधुनिक युगात सर्वत्र धावपळ, स्वार्थ आणि नफेखोरी दिसून येते, कोणाकडेही इतरांसाठी वेळ नाही. परोपकाराची भावना झपाट्याने लोप पावत आहे, अशा काळात मानवी सामाजिक बांधिलकी आणि माणुसकी जपणारे समाजासाठी जगणारे कमी असले, तरीही समाजाला योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न करणारे आताही आहेत. त्यापैकीच एक आहेत नागपूर शहरातील उच्चशिक्षित सुप्रसिद्ध लेखक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रीतम भीमराव गेडाम, जे अनेक वर्षांपासून गंभीर सामाजिक प्रश्न, विकास आणि जनजागृतीसाठी लेखक, स्तंभकार, समाजसेवक, मार्गदर्शक, साहित्यिक, प्राध्यापक, अतिथी व्याख्याता, सल्लागार, पर्यावरणवादी, विश्लेषक अशा अनेक भूमिका सेवेच्या रूपाने पार पाडत आहेत. सामाजिक समस्यांवरील त्यांचे हजारो लेख जागृती आणि लोककल्याणासाठी जगभरातून प्रकाशित झाले आहेत, ज्यासाठी त्यांचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. समाजातील प्रत्येक घटकाला जागरुक व्हावे या उद्देशाने वनीकरण, व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, करिअर मार्गदर्शन, रोजगाराभिमुख, शैक्षणिक समुपदेशन, व्याख्याने करीत असतात. केंद्र आणि राज्य सरकारद्वारे पुरस्कृत अनेक संस्थांसह सामाजिक उपक्रमांवर विविध कार्यक्रम राबवितात. त्यांच्या अशाच समाजसेवेने भारावून अभिजित बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था व "एकता रॅली आयोजन समिती" अमरावती तर्फे उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी यावर्षीचा महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा सन्मान "विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज सेवा गौरव पुरस्कार २०२३" यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
दरवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अमरावती शहरात सर्व जाती धर्माच्या अनुयायी मोठ्या संख्येने एकत्र येऊन एकता रॅलीचा भव्य कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमाचे हे २५ वें वर्ष होते. यामध्ये विविध सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून समाजात एकता, बंधुता, सौहार्दाचा संदेश दिला जातो. समाजाच्या उत्थानासाठी विशेष योगदान देणाऱ्या विशेष व्यक्तीला राज्याचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. यंदाचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार डॉ. प्रीतम भी. गेडाम यांना देण्यात आले.
हा प्रतिष्ठित पुरस्कार अमरावती येथे प्रमुख पाहुण्यांचा हस्ते प्रदान करण्यात आला. प्रमुख पाहुणे मंडळींमध्ये माननीय डॉ. निधी पांडे, विभागीय आयुक्त (अमरावती), पवनीत कौर, जिलाधिकारी (अमरावती), जयंत नाईकनवरे, पोलीस महानिरीक्षक (अमरावती परिक्षेत्र) डॉ. नविनचंद्र रेड्डी, पोलीस आयुक्त (अमरावती शहर), सहाय्यक पोलीस आयुक्त तथा पोलीस उपायुक्त, (अमरावती), डॉ.प्रसाद वाडेगावकर, प्र-कुलगुरू, संत गाडगे बाबा अमरावती विदयापीठ (अमरावती), बळवंतराव वानखडे, आमदार (दर्यापूर), बबलूभाऊ शेखावत, काँग्रेस पक्षनेते, महानगरपालिका (अमरावती), डॉ. बालचंद्र खांडेकर, ज्येष्ठ साहित्यकार (नागपूर), डॉ. धनराज डहाट, ज्येष्ठ साहित्यकार (नागपूर), डॉ. नीरज बोधी, पाली प्राकृत विभाग प्रमुख, रातुम नागपूर विदयापीठ (नागपूर), जगदीश भाऊ गुप्ता, माजी पालकमंत्री (अमरावती), प्रा.जावेद पाशा, प्रख्यात विचारवंत (वरोरा), डॉ. संजय राऊत, तज्ञ न्यूरोलॉजिस्ट (नागपूर), उच्छाब मल्लिक, वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक, एलआयसी (अमरावती), जीवन पाटील, विभागीय व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र (अमरावती), विजय बोथरा, अध्यक्ष अभिनंदन अर्बन को-ऑप. बँक लि. (अमरावती), सुदर्शनजी जैन, राष्ट्रीय नेते (बीजेएस), सुरेश जैन, अध्यक्ष चेंबर ऑफ कॉमर्स (अमरावती), एकता रॅली आयोजन समितीचे प्रमुख संयोजक समाजभूषण राजूजी नन्नावरे आणि अध्यक्ष, तुषार भारतीय, माजी महापौर व माजी स्थायी समिती सभापती, महानगरपालिका (अमरावती) व समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*अमित शाह चा एमआयएम पक्षा तर्फे निषेध* *इंदिरा गांधी चौकात निदर्शने राजीनाम्याची मागणी* मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-देशाचे...
वणी:- लोहार समाज संघटना वणीच्या वतीने भव्य राज्यस्तरीय परिचय मेळावा २१ व २२ डिसेंबर रोजी तिरुपती मंगल कार्यालय येथे...
*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली नांदगाव (खंडेश्वर):-16...
*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला* मिळाला तात्काळ न्याय ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली अमरावती:-चांदुर...
वाकपूर (दादापूर) अमरावती येथे भीमजयंती निमित्ताने रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यान आणि बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा ✍️दिनेश...