Home / विदर्भ / गडचिरोली / *स्वातंत्र्यवीर सावरकरांचा...

विदर्भ    |    गडचिरोली

*स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही* *आमदार डॉक्टर देवरावजी होळी गरजले* *अतिदुर्गम धानोरा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद*

*स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही*    *आमदार डॉक्टर देवरावजी होळी गरजले*    *अतिदुर्गम धानोरा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद*

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही

 

आमदार डॉक्टर देवरावजी होळी गरजले

 

अतिदुर्गम धानोरा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद

 

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

गडचिरोली :-खासदार अशोक नेते यांचीही यात्रेला उपस्थिती दिनांक ४/४/२०२३ गडचिरोली

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे  जननायक  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून वारंवार होत चाललेली बदनामी व अपमान जनक वक्तव्य कदापी सहन केले जाणार नाही असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी धानोरा येथील  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव यात्रेच्या सभेच्या प्रसंगी उपस्थित जनतेला मार्गदर्शन करताना केले.

यावेळी मंचावर गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते,  जिल्ह्याचे महामंत्री प्रशांतजी वाघरे,  सचिव अनिल पोहनकर ,तालुक्याचे अध्यक्ष शशिकांतजी साळवे, जिल्ह्याचे भाजपाचे नेते साईनाथजी साळवे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य लताताई पुंघाटी,  शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळूभाऊ उंदीरवाडे, नगरसेवक संजूभाऊ कुंडू  युवा भाजपा नेते सारंग साळवे , विजय कुमरे, दिलीप गावडे यांचे सह गावातील सावरकर भक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धानोरा सारख्या अतिदुर्गम मागास असलेल्या या ठिकाणी जनतेचा स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला मिळालेला प्रतिसाद हा विरोधकांना योग्य धडा शिकविणारा संदेश असल्याचे ते  म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संपूर्ण आयुष्य आपल्या भारत भूमीसाठी समर्पित राहिलेले आहे जे त्यांच्या पायाची धूळ देखील होऊ शकत नाही ते त्यांच्यावर टीका करण्याचं साहस करीत आहेत. हा प्रकार म्हणजे  सूर्यावर पाणी टाकून विझविण्याचा प्रकार  आहे. परंतु सूर्याच्या प्रखर तेजापुढे हे कधीही टिकाव धरू शकणार नाही. मात्र  तरीही असा अपमान जाणीव पूर्वक विरोधी लोकांकडून केला जात आहे. त्यामुळे यापुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा असा अपमान  जनता सहन करणार नाही. असे वक्तव्य  करणाऱ्यांना  येणाऱ्या काळात जनताच योग्य धडा शिकवेल असा विश्र्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...