वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
जगातील केवळ 15 लोकांना मिळणाऱ्या जागतिक दर्जाच्या
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-इरामस मुंड या ४५ लाखाच्या युरोपीयन स्कॉलरशिप साठी भारतातून गडचिरोली जिल्ह्यातील 25 वर्षाचा जिज्ञासु व चिकित्सक ऍड. बोधी शाम रामटेके या होतकरू, सामाजिक भान असणारा व सातत्याने मागासवर्गीय विशेषतः आदिवासीच्या प्रश्नांना घेऊन काम करणारा तरुणाची निवड झाली आहे. एवढंच नव्हे तर नुकताच कालिफोर्निया विद्यापीठाच्या स्कॉलरशिप साठी सुद्धा त्याला निवड झाल्याचा पत्र प्राप्त झाला असून सद्या तो सुप्रीम कोर्टाचे जस्टीस डी. वाय. चंद्रचूड यांच्याकडे विधी सहाय्यक या पदावर काम करत आहे.
ऍड. बोधी हा चामोर्शी येथील यशोधरा विद्यालयाचे प्राचार्य व सामाजिक क्षेत्रात सोशल एज्युकेशन मूव्हमेन्ट चे जिल्हा संयोजक शाम रामटेके व अरुणा रामटेके यांचा मुलगा असून ही बाब गडचिरोली करांसाठी अत्यंत आनंदाची व भूषणादायी असल्याने जिल्यातील विविध सामाजिक संघट्नांच्या वतीने ऍड. बोधी यांचा आई वडिलांसह सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभचे अध्यक्ष म्हणून अनिस चे विलास निंबोरकर, प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक विचारवंत नरेन गेडाम, सामाजिक व राजकीय अभ्यासक रोहिदास राऊत, बोधीचे वडील शाम रामटेके व आई अरुणा रामटेके उपस्थित होत्या.
बाबासाहेबांचा आदर्श व प्रेरणा घेऊन तरुणांनी सामाजिक भान ठेवून ऍड. बोधी यांचेसारखे शिक्षण घ्यावे व समाजाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन अध्यक्ष स्थानावरून विलास निंबोरकर यांनी केले. व माझे यश हे माझे नसून हे समाजाचे यश आहे, कारण लहानपणापासून मी आई, वडीललांकडून आपण सामाजिक दृष्ट्या सतत प्रेरणा घेत राहिलो व समाजातून प्रत्येक वेळी मला सहकार्य मिळत राहिले. महापुरुषांचे विचार सतत मला प्रेरित करत राहिले व त्यामुळे मी माझ्या शिक्षणाचा उपयोग केवळ वयक्तिक फायद्यासाठी न करता समाजाच्या उत्थानासाठी करेन असे आश्वासन ऍड.बोधी यांनी मनोगत व्यक्त करताना दिले.
कार्यक्रमाचे संचालन प्रवृत्ती वाळके, प्रास्ताविक संभाजी ब्रिगेड चे मारोती दुधाबावरे व आभार जिल्हा माळी सामाज संघटनेचे अशोक दूधबावरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी SEM चे धर्मानंद मेश्राम, प्रा. संतोष सुरडकर सर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे शेषराव येलेकर, दादाजी चापले, सत्यशोधक फॉउंडेशन चे राज बन्सोड, प्रतीक डांगे, प्रितेश अंबादे,सतीश दुर्गमवार, माळी समाज संघटनेचे सुधा चौधरी, भीमराज पात्रिकर, आदिवासी विकास युवा परिषदचे विनोद मडावी आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन चे सदानंद ताराम, अनिस इत्यादी संगठना व प्रतिनिधिनी सहकार् कार्य करावे
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...