Home / विदर्भ / गडचिरोली / बाबासाहेबांची विचारधारा...

विदर्भ    |    गडचिरोली

बाबासाहेबांची विचारधारा पृथ्वीवर कोणतीही शक्ती पुसू शकत नाही आंबेशिवनी येथे बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळयाचे अनावरण

बाबासाहेबांची विचारधारा पृथ्वीवर कोणतीही शक्ती पुसू शकत नाही    आंबेशिवनी येथे बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळयाचे अनावरण

बाबासाहेबांची विचारधारा पृथ्वीवर कोणतीही शक्ती पुसू शकत नाही

 

आंबेशिवनी येथे बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळयाचे अनावरण

 

✍️मुनिश्वर बोरकर

 गडचिरोली

 

गडचिरोली:- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या भारतीय राज्यघटनेचे दलित व मागासवर्गीय सशक्त करून सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा सक्षम केले आहे मात्र ही राज्यघटना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण देशातील जनता असे प्रयत्न हाणून पाडतील बाबासाहेबांची राज्यघटना आणि विचारधारा पृथ्वीवर कोणतीही शक्ती पुसून टाकू शकत नाही असे प्रतिपादन माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री विजय वटडेटीवार यांनी केले परवा येथील आंबे शिवनी गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी बोलताना केले बौद्ध समाज आणि तक्षशिला बुद्ध विहार यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत होते बौद्ध भिक्षु भंते त्रिशरण पंचशील संघवत आमदार देवराव होळी माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस डॉक्टर नामदेव किरसाण माजी जि. प. अध्यक्ष रामभाऊ मेश्राम आरपीआयचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे विधानसभा प्रमुख प्रदीप भैसारे विजय बनसोड कविता मडावी कु. सरीता टैंभुणे सरपंच यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना श्री वडेट्टीवार यांनी सध्याच्या सरकारवर सडकून टीका केली मागासवर्गीय आरक्षण नाकारली जात आहे लोकांचे लोकशाही हक्क दडपली जात आहे आणि विशिष्ट विचारसरणीच्या सत्ता आणण्यासाठी धर्मनिरक्षकता तत्वे नष्ट केली जात आहे हे देशासाठी आणि तेथील लोकांच्या प्रगतीसाठी अत्यंत धोकादायक आहे राज्यघटनेच्या तत्त्वावर देश चालवावा लागेल अन्यथा नागरिक उठून बंड करील असा इशाराही त्यांनी दिला आपले अध्यक्ष भाषणात श्री रोहिदास राऊत म्हणाले की संविधान आणि बौद्ध धर्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या दोन महान गोष्टी आहेत आणि त्यांचे स्मारके आणि पुतळे जगभर उभारले गेले आहेत ही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे समता आणि बंधुत्व आधारित विचारधारा देशवासीयाचे कल्याण करू शकेल आणि ती जपली तर सुरक्षित केली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केली यावेळी इतर पाहुण्यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाच्या प्रारंभ भंते त्रिशरण पंचशील यांनी बुद्ध वंदनाचे पठण केले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी सुनीता राऊत यांनी केले संचालन जगन जांभुळमाया यांनी तर आभार बाळकृष्ण राऊत यांनी केले कार्यक्रमाला आजूबाजूचे गावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते रात्री सुप्रसिद्ध गायक विकास राजा यांच्या संगीतमय कार्यक्रम सादर केला

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...