वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :उमेश इंगळे
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी कोकणातील महाड जि.रायगड येथे अस्पृश्यांचाही पाण्यावर हक्क आहे.यासाठी केलेला सत्याग्रह म्हणजे चवदार तळे सत्याग्रह
चवदार तळे सत्याग्रहाची पार्श्वभूमी :
अस्पृश्यांना सार्वजनिक पानवठ्यावर पाणी पिण्याचा समान हक्क देणारा कायदा 1923 साली सिताराम केशव बोले यानी मुंबई कायदेमंडळात पास करुन घेतला होता.आणि मग त्यानंतर 1927 मध्ये महाड नगरपालिकेचे अध्यक्ष सूरेंद्रनाथ टिपणीस यांनी नगर पालिकेचे प्रमुख या नात्याने अस्पृश्यासाठी सार्वजनिक पाणवठे खुले असल्याचे नगर पालिके तर्फे जाहीर केले होते.पण स्पर्श हिंदूच्या भीतीमुळे तेथील अस्पृश्यांनी त्या चवदार तळ्याचे पाणी नेण्याचा हक्क बजावला नव्हता म्हणून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सहकारी ह्यानी महाड येथे 19 व 20 मार्च 1927 रोजी पाण्याचा चवदार तळे सत्याग्रह आयोजित केला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात जवळपास 10 हजार लोकांचा सहभाग असलेल्या सत्याग्रहात आम्ही माणसे आहोत हे जगाला ठणकावून सांगण्यासाठी सत्याग्रही फाटके,मळके,जिर्न झालेले कपडे घालून व पाठीवर भाकऱ्या बांधून सत्याग्रहासाठी आले होते.10 वर्षाच्या बालका पासून ते 80 वर्षाचे वृध्द सत्याग्रहात सहभागी होते.
ब्राह्मणाचाही सहभाग:
ब्राह्मणेतर (बहुजन) पुढारी श्री जेधे व दिनकरराव जवळकर यांनी महाड सत्याग्रहाला आमच्या पक्षाचा पाठिंबा देत असताना एक अट घातली होती. सत्याग्रहात ब्राह्मण जातील कार्यकर्त्यास सामील करण्यात येऊ नये.त्यावर उत्तर देताना बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ब्राह्मण लोक आमचे वैरी नसून ब्राह्मणग्रस्त ( मनुवादी) लोक आमचे वैरी आहेत असे आम्ही समजतो. ब्राह्मण्यरहित ब्राम्हण (मनुस्मृती न मानणारा ) आम्हाला जवळचा वाटतो.तर ब्राह्मण ग्रस्त ब्राह्मणेतर (बहुजन)आम्हास दूरचा वाटतो असे स्पष्ट सांगितले होते.आमच्या सत्याग्रहात भाग घेण्यास कोणत्याही जातीच्या व्यक्तीस मोकळीक आहे.कारण आमचे भांडण कोणत्याही जातीशी नसून तत्वाशी आहे.जे आमच्या पवित्र कार्यास मदत करतील त्यांचे आम्ही आभार मानु असे म्हणून आपली स्पष्ट केली होती.चवदार तळे सत्याग्रहात ब्राह्मण असलेले बापूराव जोशी,घारीया,तुळजाराम,मिठादी, सितारामपंत शिवतरकर,गंगाधरपंत गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे,अनंतराव चित्रे,सुरेंद्रनाथ टिपणीस चंद्रसेन या इत्यादी ब्राह्मण पुढार्याचा सहभागी होता हे विशेष
मनुवाद्यांच्या गांडीला आग लागली :
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चवदार तळ्याच्या पायऱ्या उतरून खाली गेले व ते खाली वाकले आणि त्यांनी तळ्यातील ओंजळभर पाणी प्राशन केले होते. त्यांच्या सोबत प्रंचड संख्येने असलेल्या अस्पृश्य समुदायाने तळ्यातील पाणी प्राशन केले होते.अशा प्रकारे सत्याग्रह संपला होता. पण एका अस्पृश्याने पाण्याला हात लावला एका अस्पर्शाने पाणी पिले त्यामुळे मनुवाद्याच्या गांडीला मिरच्या लागल्या होत्या. त्यांचा धर्म वाटला होता. म्हणून त्यांनी गावभर अशी दिवंडी फिरवली की महाराणी तळे बाटविले आता ते विरेश्वर मंदिर बाटविणार त्यामुळे आता आपल्या धर्मावरच घाला पडणार आहे.त्यामुळे सर्व स्पर्श हिंदू एकवटले त्याने हातात लाठ्या काट्या घेतल्या आणि जिथे अस्पृश्य दिसेल त्यांना फोडून काढले होते.अनेक निष्पाप गरिब अस्पृश्य घायाळ झाले होते. स्त्रिया मुले यांनाही सोडले नाही मंडपात शिजलेल्या अन्नात माती कालवली होती. भांड्याची मोडतोड केली होती महाड शहरात जिथे अस्पृश्य दिसेल त्यांना जनावरासारखे मारले होते.अस्पृश्यांना शेवटी बाबासाहेबांनी स्वत दवाखान्यात नेले होते.तेव्हा दवाखान्यातील स्पर्श डॉक्टर चिडून अस्पृश्याना म्हणायचे तुम्हाला प्यायला पाणी पाहिजे ना हे घ्या पाणी म्हणून चिडवायचे पोलीसांनी हल्ला करणाऱ्या गुंडापैकी 8 जणांना पकडले होते. त्यांना 6 जून 1927 रोजी न्यायालयाने 4 महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती.न्यायमूर्ती इंग्रज असल्यामुळेच हे शक्य झाले होते.
सत्याग्रहाचा उद्देश:
4 ऑगस्ट 1927 रोजी महाड पालिकेने पुन्हा एक ठराव घेऊन त्यात चवदार तळे खुले झाले असल्याचा पूर्वीचा आपला निर्णय ठराव मागे घेतला. त्यानंतर 14 डिसेंबर 1927 रोजी मा.न्यायधीस वैद्य यांनी असे आदेश काढले की न्यायालयाचे दुसरा आदेश येईपर्यंत चवदार तळ्यावर अस्पृश्य लोकांनी जाऊ नये पाणी भरू नये असा मनाई हुकूम काढला त्यानंतर 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे केलेल्या भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा उद्देश सांगताना म्हणतात हा सत्याग्रह चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी नव्हता कारण चवदार तळ्याचे पाणी पिल्याने आम्ही काय अमर होणार अशातला भाग नाही.आज पावेतो चवदार तळ्याचे पाणी आम्ही प्यालो नव्हतो म्हणून आम्ही काही मेलो नाही. इतराप्रमाणे आम्ही देखील माणसे आहोत हे सिद्ध करण्यासाठीच चवदार तळ्याचा सत्याग्रह होता असे ते शेवटी म्हणाले
सत्यमेव जयते:
शेवटी डिसेंबर 1937 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने अशा निर्णय दिला की अस्पृश्यांनाही चवदार तळ्यामधील पाणी पिण्याचा अधिकार आहे
सत्य एक तर खोटे सांगणारे हजार झाले,
मानवतेसाठी लढणारे सर्व नेते बेजार झाले.
भिमाने पाण्याला हाथ लावताच दादासाहेब,
महाडचे कडु पाणी ही चवदार झाले.
जयभीम
कडु पाणीही चवदार झाले
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...