Home / विदर्भ / गडचिरोली / माळी समाजाच्या वतीने...

विदर्भ    |    गडचिरोली

माळी समाजाच्या वतीने महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिन साजरा

माळी समाजाच्या वतीने महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिन साजरा

माळी समाजाच्या वतीने महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिन साजरा

 

✍️मुनिश्वर बोरकर

 गडचिरोली

 

 

गडचिरोली:-माळी समाज महिला संघटना गडचिरोलीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले स्म्रुतीदिन तथा जागतिक महिला दिन

फुले दांपत्य प्रतिष्ठान गडचिरोली येथे साजरा करण्यात आला. यावेळी

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अंजनाबाई वाढई , स्वागताध्यक्ष  माळी समाज संघटनेच्या अध्यक्षा सुधा चौधरी, प्रमुख वक्ते प्रा. संध्याताई येलेकर  व  प्रा. वर्षाताई राजगडे , प्रमुख अतिथी म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रमुख विलास निंबोरकर,नवेगाव येथील ग्राम पंचायत सदस्य विभा उमरे, माळी समाज सदस्य हरीदास कोटरंगे, सुखदेवजी जेंगठे  उपस्थित होते.

प्रमुख वक्ते प्रा. संध्याताई येलेकर  यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, माणूस म्हणून स्वतः ची जाणीव करून इतरांना जाणीव करून द्यावी.धार्मिक ग्रंथांनी स्त्रियांच्या  मानवाधिकार चे  कसे हनन केले,हे सांगताना धर्मग्रंथातिल स्त्रिया न होता सावित्री म्हणून घडा .प्रसार माध्यमांचा चांगला वाईट परिणाम लक्षात घ्या.चांगलं दिसण्यापेक्षा चांगलं असण्याकडे लक्ष द्या ,असे विचार मांडले.

प्रा.वर्षाताई राजगडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना, चांगले कार्य करीत असताना विवेकाची कसोटी लागत असते,   त्यासाठी विवेकाची जाणिव असणाऱ्यांची गरज आहे.सावित्रिमाईंनी भांडवल न जमवता समाजासाठी कसा त्याग केला हे सांगताना महिलांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे.

महिलादिनाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, राजकारणाचा अभ्यासही असावा . वैचारिक पातळी वाढणे गरजेचे आहे, स्वातंत्र्य हवे स्वैराचार नको.

विलास निंबोरकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना,महामानवांचे विचार सांगून ते डोक्यावर घेऊ नका, डोक्यात घ्या, असे सांगितले.

अंधश्रध्देविषयक माहिती सांगून प्रयोग करून दाखवले.

सुधा चौधरी, मॅडम यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, सावित्रीमाई फुले यांच्या प्रमाणे स्त्रियांमध्ये अनेक चांगले गुण आहेत,त्यांचा वापर सकारात्मक दृष्टिने केला तर त्या कोणत्याही क्षेत्रात मागे येणार नाही.

विभा उमरे. यांनीही महिलांना सावित्रीमाईंच्या धाडसी व्रुत्तीचा संदेश देऊन महिलांना उदबोधन केले.

या कार्यक्रमात सामान्य ज्ञान स्पर्धा, महामानवांच्या जीवनावरील गीत स्पर्धा,    नृत्यस्पर्धा, तसेच रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या.

या कार्यक्रमात               *प्रकाश कन्या* हे

पथनाट्य सादर करण्यात आले.यात जीवनधारा खोब्रागडे,विभा उमरे,माही खोब्रागडे, राजेश्वरी सहारे यांनी भूमिका साकारल्या.

या कार्यक्रमासाठी माळी समाजातील सुधा चौधरी, मंगला मांदाडे, संगिता मांदाडे , मनिषा निकोडे, ज्योती मोहुर्ले , ज्योती जेंगठे ,चंदा गावतुरे , संजीवनी कोटरंगे , अनिता शेंडे,प्रभा सोनुले,मिनाताई जेंगठे , ज्योत्स्ना

लेनगुरे , विशाखा निकोडे,लोमा मोहुर्ले , शुभांगी सोनुले,संध्या भेंडारे इ.महिलांनी व पुरूषांनी परिश्रम घेतले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैताली चौधरी , प्रास्ताविक अल्का गुरनुले , यांनी केले तर आभार संध्या भेंडारे यांनी मानले.

याप्रसंगी बहूसंख्य महिला उपस्थित होत्या.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...