वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:- स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत जास्तीत जास्त प्रतिनिधी निवडून पाठविण्याचा संकल्प
गडचिरोली,
वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतिने येथिल विश्रामगृहात जिल्हा, तालुका व शहर पदाधिका-यांची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थां जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणूकीत जास्तीत प्रतिनिधी निवडून पाठविण्याचा संकल्प पदाधिका-यांनी यावेळी केला.
जिल्हा स्तरीय झालेल्या बैठकिला मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्याच्या निरीक्षक तनुजा रायपूरे प्रामुख्याने उपस्थित होत्या, बैठकिच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे होते तर महासचिव योगेंद्र बांगरे, संगटक भिमराव शेंडे, उपाध्यक्ष जी के बारसिंगे, महिला नेत्या मालाताई भजगवळी, संघटिका प्रज्ञा निमगडे, जेष्ठ नेते एन आर रामटेके, युवा नेते चंदू नैताम आदिं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बैठकित सर्व तालुक्याचा आढावा जिल्हा परिषद सर्कलनुसार व शहराचा आढावा प्रभागरचनेनुसार तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांकडून घेण्यात आला. तसेच प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलवारीज व शहरातील प्रभागवारीज निरीक्षकांची नेमणूक करून गाव तिथे शाखा व बुथ बांधणी करण्याचे तसेच प्रत्येक तालुक्यात कार्यकर्ता मेळावे घेण्याचे ठरविण्यात आले, यावेळी ईतरही महत्वपूर्ण विषयावर गंभीर चर्चा करण्यात आली.
बिजेपी, कॉंग्रेसच्या घराणेशाही व हुकूमशाहीच्या राजकारणामूळे जनता त्रस्त झाली असल्याने सक्षम व स्वाभिमानी नेतृत्व असलेल्या बहुजन हृदय सम्राट एड बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेऊन वंचित जाती समुह मोठ्या प्रमाणात जोडल्या जात असल्याने येणा-या काळात वंचित उपेक्षीतांची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील वंचित समुहाला आपल्या सोबत जूळवून स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्याचे आवाहन निरीक्षक तनुजा रायपूरे यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना केले.
या बैठकिला गडचिरोली तालुकाध्यक्ष बाशिद शेख, आरमोरी तालुकाध्यक्ष राजेंद्र गेडाम,कोरची तालुकाध्यक्ष सुदाराम सहारे, चामोर्शी तालुकाध्यक्ष एड अनंत उंदिरवाडे, धानोरा तालुकाध्यक्षा हेमलता सहारे, महासचिव जासू सहारे, कुरखेडा तालुकाध्यक्ष योगेश टेंभुर्णे, वडसा तालुकाध्यक्ष संजय धारगावे, उपाध्यक्ष मनोहर कुळमेथे, गडचिरोली शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, मिडीया प्रमुख जावेद शेख, शहर उपाध्यक्ष तुळशिराम हजारे, संगटक भारत रायपूरे, मंदा तुरे, सिमा खोब्रागडे, मनिषा वानखेडे, रामदास अंबादे, अनिता कांबळे, वसंतराव बाबनवाडे, नकुल सहारे, माला मेश्राम, गिता हलदर, संध्या रामटेके आदि जिल्हा, तालुका व शहराचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...