वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
*गॅस दर वाढीविरोधात महिला काँग्रेसच्या वतीने गडचिरोलीत आंदोलन*
काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत सर्वसामान्य नागरिकही सहभागी
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली : महिला काँग्रेसच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात गॅस दर वाढीच्या निषेधार्थ इंदिरा गांधी चौकात आंदोलन करण्यात आले. आंदोलन कर्त्यानी गॅस सिलेंडरला हार लावून चुलीवर स्वयंपाक केला सोबतच "बहोत हो गई महगाई की मार, बस करो मोदी सरकार "गॅस दर वाढ कमी करा" "महंगा सिलेंडर महंगा तेल मोदीजी आप सरकार चालणे मे हो गये फेल"अशा जोरदार घोषणा देत केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील होत आहे. महागाईने होरपळून निघालेल्या जनतेला केंद्र सरकारने पुन्हा धक्का दिला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी तर कमर्शियल गॅस सिलेंडर मधे 350रुपयांची वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरने हजाराच्या वर आकडा पार गेल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त आहेत. या सर्वांचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होत आहे.वाढत्या महागाईने सामान्य नागरिक बेजार झालेला आहे. मात्र केंद्र सरकार महागाई कमी करण्याऐवजी नेहमी नवे दर जाहीर करून सर्वसामान्यांना एकामागून एक धक्का देत आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सचिव डॉक्टर चंदाताई कोडवते यांनी केले. आंदोलनात प्रामुख्याने जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉक्टर नामदेव किरसाण, प्रदेश सचिव डॉक्टर नितीन कोडवते, शहराध्यक्ष सतीश विधाते, विश्वजीत कोवासे, रोजगार सेल कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, महिला काँग्रेस गडचिरोली तालुका अध्यक्ष कल्पना नंदेश्वर, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, माजी नगरसेवक रमेश चौधरी, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, तालुका अध्यक्ष वसंत राऊत, दिवाकर निसार, धिवरू मेश्राम, दिलीप घोडाम, हरबाजी मोरे, अब्दुल पंजवानी, रुपेश टिकले, भारत येरमे, घनश्याम मुरवतकर, नितेश राठोड, संजय मेश्राम हेमंत भांडेकर श्री कापकर, माजिद सय्यद, निकेश कामेडवार, अविनाश श्रीरामवार गौरव एनप्रेरड्डीवार, विपुल एलट्टीवार सह मोठ्या संख्येने सामान्य नागरिक, महिला आणि काँग्रेस पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...