आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
वाशिम:-वाशिम जिल्ह्यातील जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत *बोराळा* (एरंडा )येथील गावात लोकप्रिय असलेल्या गरीब कुटुंबातील उपसरपंच विश्वास श्रीपत कांबळे यांचे दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी भर दिवसा ढवळ्या गावगुंडांनी चार चाकी वाहनाने अपहरण करून त्यांची हत्या करण्यात केली .
या क्रूर हत्येची माहिती कळताच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजीखासदार प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांनी दिनांक 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता बोराळा येथे त्यांच्या गावी जाऊन मृतक विश्वास कांबळे यांच्या घरी भेट दिली.
या भेटीदरम्यान मृतक उपसरपंच विश्वास कांबळे यांच्या पत्नी लिलाबाई कांबळे ,मुलगी पंचशीला लबडे व त्यांचे मोठे बंधू गोवर्धन कांबळे, डि .के .कांबळे यांची भेट घेऊन त्यांच्याकडून अतिशय गांभीर्याने या निर्दयीपणे करण्यात आलेल्या क्रूर हत्येच्या संदर्भातील माहिती जाणून घेत प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी मृतक विश्वास कांबळे यांच्या कुटुंबातील सर्वांना धीर देऊन त्यांचे सात्वन केले.
त्यानंतर बुद्ध विहारा कडे जात असताना गावच्या
प्रथमदर्शनी लागलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले बुद्ध विहारांमध्ये तथागत बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमांचे पूजन केल्यानंतर बुद्ध विहारात निषेध सभा घेण्यात आली असता प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी या क्रूर घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत हत्या करणाऱ्या या गावगुंडांवर व या घटनेची संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने गृहमंत्रालयकडे पाठपुरावा केल्या जाईल असे सांगून गावातील सर्व समाज बांधवांनी अत्याचार ग्रस्त विश्वास कांबळे यांच्या कुटुंबांच्या पाठीशी एकजुटीने उभे राहून त्यांना धीर देण्याचे आव्हान बुद्ध विहारात घेण्यात आलेल्या निषेध सभेप्रसंगी बोलताना प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी केले. प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले मराठवाडा प्रदेशाध्यक्ष गणेशराव पडघन वाशिम जिल्हा अध्यक्ष दौलत हिवराळे बुलढाणा जिल्हा नेते कैलास नरवाडे सुवर्णा वानखडे सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी बुद्ध विहारात घेण्यात आलेल्या निषेध सभेमध्ये मृतक उपसरपंच विश्वास कांबळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...