वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*
*वाशिम*: स्थानीक कारंजा शहरातील वाढते अतिक्रमण रहदारीला मोठा अडथळा निर्माण करीत असून रोड लगत असलेल्या अतिक्रमणाने अनेक अपघात होताना उघड्या डोळ्यांनी पाहत राहावे लागत होते शहरात अनेक धन धडग्याचे अतिक्रमण आहे त्यात शहरातील मोठे व्यापारी ,काही नोकरपेक्षातील कर्मचारी यांचा समावेश आहे .त्यामुळे अतिक्रणविरोधी मोहीम राबविणे थोडे शर्यतीचे होते असे असले तरी कारंजा तालुक्याचा उप विभागीय पदाचा आणि मुख्य तहसीलदार पदाचा पदभार सांभाळणारे धीरज मांजरे हे कारंजा शहरासाठी एक आशावाद वाटत आहेत . काल जुन्या जालना रोड वरील अतिक्रमण हटविताना असाच काहीसा अनुभव आला कारंजा मंगरूळपीर रोड वर हॉटेल आदिमाया नावाचे प्रशस्त हॉटेल एका पोलीस अधिकारी उभे करून प्रशासनाची नाच्चक्की केल्याने गावात एकच चर्चा होती की हे हॉटेल वरील अतिक्रमण काढले जाणार की नाही मात्र एम.एस.आर. डी.चे कसबे आणि कारंजा चे मुख्य तहसीलदार धीरज मांजरे यांनी प्रशासनातील कितीही मोठे अधिकारी असो व राजकारणातील नेता कायदा हा सर्वासाठी सारखाच हे दाखऊन दिले .आणि या रोड वरील गरीब लोकांनी केलेले अतिक्रमण हटविताना च हॉटेल आदिमाया ही नष्ट केली .या हॉटेल वरील अतिक्रमण काढताना सदर हॉटेल मालकाकडून बऱ्याच अडकड्या आणल्या गेल्या मात्र त्यासाठी उपजिल्हा अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी याचे सहकार्य घेऊन सदर अतिक्रमण हटविले त्यामुळे कारंजा या दोन्ही अधिकार्याच्या कार्याचे कौतुक केले गेले यावेळी अनेकांनी उपस्थित मुख्य तहसीलदार मांजरे याना धन्यवाद दिले.
अतिक्रमण स्थळी स्वतः शक्तिनिशी उभे राहून स्वतः हे अतिक्रमण हटविण्याची धमक दाखविनारे धीरज मांजरे हे घटना स्थळ कार्य वाही पूर्ण होऊ पर्यंत ठान मांडून होते.त्यावेळी त्यांनी दुपारचे जेवणही आपल्या गाडीतच केले त्यामुळे कारंजा शहर आणि तालुक्यात त्याच्या प्रशासनाचा विषय चर्चेला जात आहे.या धडक कार्य वाही मुळे अतिक्रमण करणाऱ्याच्या छातीत धडकी भरली आहे.त्याने अशा बेधडक कारवाहीची अपेक्षा शहरातील रोड लगत असलेल्या अतिक्रमण हटवीन्यासाठी होणे गरजेचे आहे .असे मत अनेकांनी बोलून दाखविले सदर अतिक्रमण मोहीम हटविताना अजिंक्य भारत दैनिकाचे प्रतिनिधी घटना स्थळी उपस्थित राहून अतिक्रमण हटविताना पक्षपात होणार नाही यासाठी कर्तव्यबजावताना मुख्य तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत दैनिक अजिंक्य भारत ची मागील बातम्या आणि पाठपुरावा यामुळे आणि स्थानिकांच्या तक्रारीमुळे सदर अतिक्रमण मोहीम राबविली गेली असल्याचे सांगितले त्यामुळे दैनिक अजिंक्य भारतच्या बातमीचा असर आणि प्रशासनात असलेली विस्वनियाता यामुळे उजागर झाली आहे. या अतिक्रमण मोहिमेत कारंजा महसूल विभाग, एम एस आर डी सी,पंचायत समिती,कारंजा शहर पोलिस स्टेशन,स्थानिक ग्राम पंचायत आधीचा सामूहिक सहभाग होता.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...